Oscars 2023: कशापासून आणि किती खर्चात तयार होते ट्रॉफी? जाणून घ्या याबाबत सगळं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 11:25 AM2023-03-13T11:25:13+5:302023-03-13T11:27:39+5:30
Oscars 2023: RRR मधील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल सॉंग आणि ‘द एलिफेंट विस्पर्स' बेस्ट डॉक्युमेंट्रीचा पुरस्कार मिळाला. अशात ऑस्करच्या ट्रॉफीचीही चर्चा होत आहे.
Oscars 2023: मनोरंजन विश्वातील सगळ्यात मोठा सन्मान ऑस्कर अवॉर्डची सध्या चर्चा रंगली आहे. भारताला यावेळी दोन ऑस्कर मिळाले. RRR मधील 'नाटू नाटू' (Naatu Naatu Song) गाण्याला बेस्ट ओरिजनल सॉंग आणि ‘द एलिफेंट विस्पर्स' बेस्ट डॉक्युमेंट्रीचा पुरस्कार मिळाला. अशात ऑस्करच्या ट्रॉफीचीही चर्चा होत आहे. याच ट्रॉफीबाबत काही इंटरेस्टींग गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सोन्याची असते का ट्रॉफी?
ऑस्करची ट्रॉफी बघितल्यावर सगळ्यांना हेच वाटतं की, ही ट्रॉफी सोन्यापासून बनलेली असेल. पण हे सत्य नाही. ऑस्करची ट्रॉफी ही कांस्यापासून तयार केलेली असते आणि वरून 24 कॅरेट सोन्याचं पॉलिश असतं. ही ट्रॉफी 13.5 इंच लांब आणि याचं वजन 450 ग्राम असतं.
किती लागतो खर्च?
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एक ऑस्कर ट्रॉफी तयार करण्यासाठी 1000 डॉलर म्हणजे साधारण 82 हजार रूपये खर्च येतो. तसेच 50 ऑस्कर ट्रॉफी तयार करायला एक महिन्याचा वेळ लागतो. पण तुम्हाला वाचून धक्का बसेल की, जेव्हा तुम्ही ही ट्रॉफी विकता तेव्हा याची किंमत केवळ 1 डॉलर असते. नियमानुसार तुम्ही ही ट्रॉफी विकू शकत नाही.
आधी किती होती किंमत?
1951 मध्ये या नियमानुसार, आधी अकॅडमीने ऑस्कर ट्रॉफी खरेदी करण्याची किंमत 10 डॉलर म्हणजे 600 रूपये ठरवली होती. पण 2015 नंतर हा नियम बदलला. 2015 मध्ये अमेरिकेच्या एका कोर्टाने हा नियम योग्य ठरवला. त्यानंतर अकॅडमीने ट्रॉफीची किंमत 10 वरून एक डॉलर केली. नियमांनुसार, ट्रॉफी लिलावात देण्याआधी किंवा बाहेर विकण्यासाठी अकॅडमीची परवानगी घ्यावी लागेल. जो नियम पाळणार नाही त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.