'या' देशात पुरूष करतात महिलांची गुलामी, जनावरांसारखं ठेवलं जातं बांधून
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 03:30 PM2020-01-06T15:30:53+5:302020-01-06T15:31:08+5:30
२१व्या शतकात कुणालाही कुणाची गुलामी करायची नाहीये. पण भारतासारख्या देशात आजही सामान्यपणे काही महिलांना गुलामी सहन करावी लागते.
२१व्या शतकात कुणालाही कुणाची गुलामी करायची नाहीये. पण भारतासारख्या देशात आजही सामान्यपणे काही महिलांना गुलामी सहन करावी लागते. विकसनशिल देशातील महिलांची स्थिती फार जास्त सुधारत नाहीये. अनेक देशांमध्ये तर आजही महिलांसोबत गुलामांसारखं वागलं जातं. पण एक असाही देश आहे जिथे महिला पुरूषांना गुलामी करण्यासाठी ठेवतात.
१९९६ मध्ये तयार झालेला देश
अदर वर्ल्ड किंगडम नावाचा हा देश १९९६ मध्ये युरोपियन देश चेक रिपब्लिकपासून तयार झाला. वुमन ओव्हर मेन असा मोटो असलेल्या या देशाचं शासनही महिलांच्याच हाती आहे. या देशाची राणी पॅट्रिसिया - १ ही आहे. इथे या राणीचाच दबदबा आहे. इतर देशांनी या देशाला देशाचा दर्जा दिलेला नाही. या देशाची राजधानी ब्लॅक सिटी आहे. या देशातील पुरूष गुलामांपेक्षा वेगळे काही नाही. चेक रिपब्लिकमध्ये असलेल्या या देशाचा ध्वज, करन्सी, पासपोर्ट आणि पोलीस फोर्स आहे. येथील मूळ निवासी नागरिक केवळ महिला आहेत. या देशाची सर्वात खास बाब म्हणजे येथील राणी पॅट्रिसिया - १ चा चेहरा आजपर्यंत बाहेरील जगाने पाहिला नाहीये.
१२ कोटी रूपयांनी तयार झाला देश
या देशात पुरूषांना जनावरासारखं समजलं जातं. या देशाच्या निर्माणासाठी १२ कोटी रूपये खर्च आला होता. इथे दुसऱ्या देशातून येणाऱ्या पुरूषांना राणीसाठी सोफा किंवा खुर्ची तयार करावी लागते. त्यावरच ती बसते. इथे जर गुलामांना दारू पिण्याची इच्छा झाली तर दारू मालकाच्या पायांवर टाकली जाते, त्यानंतर गुलाम पितात.
प्रत्येक महिलेकडे एक गुलाम
राणी पॅट्रिसिया - १ हिलाच देशातील कायद्यात परिवर्तन करण्याचा अधिकार आहे. त्यांनी या देशाची नागरिकता हवी असलेल्या महिलांसाठी काही नियम तयार केले आहेत. कुणीही आपल्या सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याच्या वयात पोहचलं असेल तर त्यांना संबंध ठेवण्याचा अधिकार आहे. महिलेकडे कमीत कमी एक पुरूष गुलाम असावा. ती महिला या देशातील सर्व नियम पाळणारी असावी. महिलेला कमीत कमी पाच दिवस राणीच्या महालात रहावं लागेल.
सर्वच सुविधा असलेला देश
तीन हेक्टर म्हणजे ७.४ एकर जमिनीवर असलेल्या देशात अनेक इमारती आहेत. २५० मीटरचा एक तलाव आणि गवताचे मैदान आहेत. येथील मुख्य इमारत राणीचा महाल आहे. इथूनच देशाचं शासन चालतं. त्यासोबतच इथे स्विमिंग पूल, नाइट क्लब्सही आहेत.
गुलामांचं जगणं
येथील सर्वच महिला पुरूषांपेक्षा शक्तीशाली आहेत. पुरूषांना इथे महिलांचा सन्मान करावा लागतो. पुरूषांना २४ तास गळ्यात पट्टा बांधून ठेवावा लागतो. प्रत्येक गुलामावर एक निशाण असतो. मालकाच्या मंजूरीशिवाय ना दुसऱ्या गुलामांना जेवायलं दिल जात ना शिक्षा दिली जात. जर गुलामांना सार्वजनिक ठिकाणी मारलं तर त्यांचा आवाज येता कामा नये.