कोट्यावधी रूपयांना विकली गेली 332 रूपयांना घेतलेली पेंटिंग, स्टोर रूममध्ये फेकली होती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 10:50 AM2023-09-21T10:50:10+5:302023-09-21T10:52:37+5:30
महिलेला समजलं की, ज्या पेंटिंगला ती सामान्य समजत होती ती पेंटिंग कोट्यावधी रूपयांची आहे.
अनेकदा असं होतं की, लोकांकडे फार मौल्यवान वस्तू असतात, पण त्यांना त्याची किंमत माहीत नसते. नुकतंच न्यू हॅम्पशायरच्या एका महिलेसोबत असंच झालं. तिने घरात पडलेल्या एका जुन्या पेंटींगचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर जेव्हा तिला या पेंटिंगबाबत समजलं तेव्हा ती हैराण झाली. महिलेला समजलं की, ज्या पेंटिंगला ती सामान्य समजत होती ती पेंटिंग कोट्यावधी रूपयांची आहे.
आता न्यू हॅम्पशायर थ्रिफ्ट स्टोरमधून केवळ 4 डॉलरला म्हणजे 332 रूपयांना खरेदी केली गेलेली पेंटिंग 191, 000 डॉल म्हणजे 1.58 कोटी रुपयांना विकली गेली. आता हे सगळ्यांना हैराण करणारं आहे की, इतकी स्वस्त पेंटिंग खरेदी करण्यासाठी कुणीतरी इतके पैसे का दिले?
काही एक्सपर्टनुसार, ही पेंटिंग आर्टिस्ट एन.सी.वायथ यांची हरवलेली पेंटिंग होती. ही एक मास्टरपीस होती. रमोना नावाची पेंटिंग पेंसिल्वेनिया येथील कलाकाराद्वारे हेलेन हंट जॅक्सनच्या 1884 चं पुस्तक रमोनाच्या 1939 च्या आवृत्तीसाठी बनवलेल्या चार पेंटिंगपैकी एक होती. पेंटिंगमध्ये एका अनाथ तरूणी आपल्या सावत्र आईसोबत संघर्ष करताना दिसत आहे.
लिलाव करणाऱ्या संस्थेने सांगितलं की, एक्सपर्टने ही पेंटिंग हरवलेली मानली होती. पण मग ही न्यू हॅम्पशायरमधील एका महिलेकडे मिळाली तर सगळे हैराण झाले. महिला म्हणाली की, तिने ही पेंटिंग एका स्थानिक स्टोरमधून 332 रूपयांना घेतली होती. नंतर स्टोरमध्ये फेकण्याआधी ती रूममध्ये लावली होती.
फेसबुकवर या पेंटिंगचा फोटो शेअर केल्यानंतर तिला पेंटिंगबाबतचं सत्य समजलं. त्यानंतर तिने लिलाव संस्थेला कॉन्टॅक्ट केला. तेव्हा तिला समजलं की, ही पेंटिंग ऐतिहासिक आहे.