'ही' जीन्स असल्यावर कसली लाज?; चारचौघांतही पादा बिनधास्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 01:41 PM2018-10-17T13:41:52+5:302018-10-17T13:43:14+5:30

आता कुठेही कधीही पादता येणार

This pair of jeans can stop your fart from stinking | 'ही' जीन्स असल्यावर कसली लाज?; चारचौघांतही पादा बिनधास्त!

'ही' जीन्स असल्यावर कसली लाज?; चारचौघांतही पादा बिनधास्त!

Next

मुंबई: सार्वजनिक ठिकाणी, एखाद्या कार्यक्रमात असताना पादायला झाल्यास मोठी नामुष्की ओढवते. कारण दुर्गंध पसरल्यावर आजूबाजूला उपस्थित असणारे लोक एकमेकांकडे पाहू लागतात. त्यात जर पादणारी व्यक्ती सापडली, तर मग चार लोकांमध्ये हसं होतं. त्यामुळे अनेकजण चारचौघांत असताना स्वत:ला कसंबसं 'कंट्रोल' करतात. मात्र एका नव्या जिन्समुळे सार्वजनिक ठिकाणी, कोणत्याही प्रसंगी पादणं शक्य आहे. 

मिरर युकेनं दिलेल्या वृत्तानुसार, श्रेडीज या अमेरिकन ब्रँडनं पुरुष आणि महिलांसाठी एक नवी जीन्स तयार केली आहे. या जीन्समुळे पादल्यावर निघणारा दुर्गंध बाहेर पसरत नाही. या जीन्समध्ये कार्बन बॅक पॅनेल लावण्यात आलं आहे. त्यामुळे पादल्यानंतर निघणारा दुर्गंधी वायू जीन्समध्येच अडकतो. तो बाहेर जात नाही. एखादी व्यक्ती साधारणपणे दिवसातून 14 वेळा पादते. हा आकडा लक्षात घेऊन या जीन्सची रचना करण्यात आली आहे. 

'जीन्सचं कापड हे एखाद्या फिल्टरसारखं काम करतं. कपड्यात एक अॅक्टिवेटेड कार्बन पॅनेल असल्यानं दुर्गंध बाहेर जात नाही. यामुळे एखादी व्यक्ती कोणत्याही ठिकाणी मोकळेपणानं पादू शकते,' अशी माहिती श्रेडीजनं संकेतस्थळावर दिली आहे. मात्र ही जीन्स इतर जीन्सच्या तुलनेत बऱ्यापैकी महाग आहे. या जीन्सचा एक जोड खरेदी करण्यासाठी तुम्हाला सात हजार रुपये मोजावे लागतील. सात विविध साईजमध्ये ही जीन्स उपलब्ध आहे. 'आत्मविश्वासानं पादा' अशी टॅगलाईन या जीन्ससाठी कंपनीकडून वापरण्यात येत आहे. 
 

Web Title: This pair of jeans can stop your fart from stinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.