कबरीतून मृतदेह काढून मांस खाणारे दोन भाऊ पोलिसांच्या ताब्यात, कोरोनाच्या भीतीने केली कारवाई!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 09:32 AM2020-03-28T09:32:40+5:302020-03-28T09:37:37+5:30
कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानमध्येही मोठा फटका बसत आहे. अशात सध्याची धोकादायक स्थिती बघता या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
पाकिस्तानमध्ये मृतहेद कबरेतून बाहेर काढून खाणारे दोन भावांना अटक करण्यात आली आहे. 2013 मध्ये भक्कर जिल्ह्यात त्यांना मानवी मृतदेहाचं मांस खाण्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती. उर्दू नया दौर वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मृत मनुष्याचं मांस खाणाऱ्या या दोन भावांना काही दिवसांपूर्वी सोडण्यात आलं होतं. पण आता दोघांना कोरोनाच्या भीतीमुळे पुन्हा अटक करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानमध्येही मोठा फटका बसत आहे. अशात सध्याची धोकादायक स्थिती बघता या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
दरम्यान अटक करण्यापूर्वी हे दोन्ही भाऊ अविवाहित होते आणि भीक मागून आपलं पोट भरत होते. पण 2011 मध्ये महिलेचा मृतदेह यांच्या घरात सापडल्यावर त्यांच्यावर कबरींचा अपमान करणे आणि कबरेतून मृतदेह बाहेर काढण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. दोघांना एक-एक वर्षाची शिक्षा आणि 2 लाख रूपये दंडाची शिक्षा मिळाली होती.
मात्र, त्यानंतरही हे दोघे सुधारले नाही. दोघांनी आधीसारखंच मृतदेहाचं मांस शिजवून खाणं सुरू केलं होतं. पोलिसांना दोघांच्या घरात कढईसोबतच मांस शिजवण्याची इतरही भांडी आढळली. त्यावेळच्या मीडिया रिपोर्टनुसार, दोषी दफन केलेल्या मृतदेहांना काढून त्यांचे तुकडे करून खात होते.
अटक केल्यावर पोलीस स्टेशनमध्ये पत्रकारांसोबत बोलताना आरोपी आरिफने लहान मुलाचा मृतदेह काढण्याची बाब स्वीकारली होती. अशात पोलिसांनी त्यांना आधीच ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. महत्वाची बाब म्हणजे मानवी मांस खाण्याबाबत कोणताही कायदा नसल्याने दोघांना दहशतवाद आणि शांतता भंग करण्याच्या कलमानुसार शिक्षा दिली गेली होती.