...म्हणून त्याने बायकोला तिच्या पहिल्या पतीकडे पाठवलं, दोन पतींचा अजब-गजब करार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 03:58 PM2020-03-13T15:58:49+5:302020-03-13T16:08:38+5:30

इतकेच नाही तर त्याने पत्नीला आधीच्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचीही परवानगी दिली आहे. हे त्याच्या पत्नीलाही मान्य आहे.

Pakistan : Agreement between two husbands wife will stay with ex husband for one year api | ...म्हणून त्याने बायकोला तिच्या पहिल्या पतीकडे पाठवलं, दोन पतींचा अजब-गजब करार!

...म्हणून त्याने बायकोला तिच्या पहिल्या पतीकडे पाठवलं, दोन पतींचा अजब-गजब करार!

googlenewsNext

(सांकेतिक छायाचित्र)

पाकिस्तानातून नेहमीच काहीना काही विचित्र घटना समोर येत असतात. आणि या घटनांची जगभरात चर्चाही होते. अशीच एक घटना लाहोरच्या रायविंग परीसरातील आहे. इथे दोन पतींमध्ये एक विचित्र करार झाला आहे. इथे एका पतीने त्याच्या पत्नीला एका वर्षासाठी तिच्या घटस्फोटीत पतीकडे सोपवलं आहे. त्याने असं करण्याचं एक कारणही खास आहे.

महिलेच्या सध्याच्या पतीने या कराराबाबत स्थानिक कोर्टात लिखित जवाब सादर केला. त्यात त्याने लिहिले की, 'माझ्या पत्नीच्या आधीच्या पतीला मुलं आहेत आणि त्या मुलांची ते व्यवस्थित काळजी घेऊ शकत नसल्याने हैराण आहेत. त्यामुळे त्यांच्या सहमतीने मी माझ्या पत्नीला त्यांच्यासोबत आणि त्यांच्या मुलांसोबत राहण्याची परवानगी देतो'. इतकेच नाही तर त्याने पत्नीला आधीच्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचीही परवानगी दिली आहे.

वर्तमानातील पती म्हणाला की, त्याची पत्नी सध्या गर्भवती आहे. त्यामुळे असा करार करण्यात आला आहे की, तो तिला कोणत्याही वेळी येऊन भेटू शकतो आणि एक वर्षाने त्याच्या बाळाला परत घेऊन जाऊ शकतो. तोपर्यंत त्याची पत्नी रूबीना बीबी तिच्या आधीच्या म्हणजेच घटस्फोटीत पतीसोबत राहणार.

(सांकेतिक छायाचित्र)

महिलेच्या पहिल्या पतीने या करारावर त्याचाही जवाब सादर केला आहे. त्यानेही हे मान्य केलं आहे की, तो रूबीना बीबी आणि मुलांची पूर्ण काळजी घेईल. त्यांना आनंद देण्याचा जमेल तो प्रयत्न करेल. सोबतच रूबीना बीबीने सुद्धा पहिल्या पतीला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी दिली आहे. रूबीना बीबीच्या पहिला पतीने आणि आताच्या पतीने सहमतीने या करारावर सही केली.

या करारावर सही झाल्यावर महिलेच्या वर्तमान पतीने पत्नीला तिच्या पहिल्या पतीकडे सोपवलं. यावेळी त्याने सांगितले की, त्याची पत्नी तिच्या मुलांबाबत दु:खी राहत होती. कारण तिच्या पहिल्या पतीची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे हा करार करण्यात आला. जेणेकरून ती तिच्या मुलांसोबत आनंदी राहू शकेल. असेही सांगितले जात आहे की, ही जगातली अशी एकुलती एक घटना असेल ज्यात दोन पतींना असा करार केला.


Web Title: Pakistan : Agreement between two husbands wife will stay with ex husband for one year api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.