कमाल! एकाच दिवशी येतो आई-वडील आणि 7 मुलांचा वाढदिवस, वर्ल्ड रेकॉर्ड कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 04:34 PM2023-07-12T16:34:27+5:302023-07-12T16:34:58+5:30
सगळ्याच मुलांची वयं 19 ते 30 दरम्यानची आहे. हैराण करणारी बाब म्हणजे सगळ्यांचा वाढदिवस एक ऑगस्ट रोजी असतो. हाच रेकॉर्ड आहे.
Pakistan Weird Family: पाकिस्तानमधून एक अवाक् करणारी घटना समोर आली आहे. लरकानामध्ये एक फारच अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. घरातील सगळ्याच 9 सदस्यांची एक बाब कॉमन आहे. ती म्हणजे ते सगळेच एकाच दिवसाला जन्माला आले होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, एका परिवारात 9 लोक आहेत. पिता अमीर अली, आई खुदेजा आणि त्यांची सात मुले सिंधु, ससुई, सपना, आमिर, अंबर, अम्मार, अहमर सगळ्यांची जन्मतारीख एकच आहे. सगळ्याच मुलांची वयं 19 ते 30 दरम्यानची आहे. हैराण करणारी बाब म्हणजे सगळ्यांचा वाढदिवस एक ऑगस्ट रोजी असतो. हाच रेकॉर्ड आहे.
पुढील महिन्यात एक ऑगस्ट रोजी अमीर अली आणि खुदेजासाठी फार स्पेशल दिवस आहे. कारण या दिवशी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि याच दिवशी पती-पत्नीचा वाढदिवस आहे. मोठ्या मुलीचा जन्म ठीक एक वर्षानंतर एक ऑगस्टला झाला. 1991 मध्ये अमीर-खुदेजा यांनी त्यांच्या वाढदिवसालाच लग्न केलं होतं.
गिनीज रिकॉर्ड बुकने पुढे सांगितलं की, सातही मुलांकडे एकाच तारखेला जन्माला येण्याच्या सगळ्यात जास्त भाऊ-बहिणींचा रेकॉर्डही आहे. हा रेकॉर्ड आधी अमेरिकेतील कमिंस परिवारातील पाच मुलांच्या नावावर होता. ज्यांचा जन्म 1952 आणि 1966 दरम्यान 20 फेब्रुवारीला झाला होता. तोपर्यंत पाकिस्तानातील या परिवाराचा शोध लागला नव्हता. आता हा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.
अमीर अली त्यांची पहिली मुलगी सिंधुचा जन्म 1 ऑगस्ट 1992 ला झाल्यावर हैराणही होते आणि आनंदही होते. त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा वाढदिवसही याच दिवशी असतो. ते म्हणाले की, या घटनेने दोघेही पती-पत्नी अवाक् आणि आनंदी होते. त्यानंतर प्रत्येक मुलाचा जन्म याच तारखेला झाला. हे त्यांना देवाचं गिफ्ट वाटतं. महत्वाची बाब म्हणजे सगळ्या मुलांचा जन्म नॉर्मल डिलिव्हरीच्या माध्यमातून झाला.