इंग्रजी बोलण्यात पाकिस्तानी लोक भारताच्या ६ पट पुढे... अभ्यासातून समोर आलं अनपेक्षित सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 06:05 PM2023-11-11T18:05:20+5:302023-11-11T18:07:10+5:30
'फाडफाड इंग्रजी बोलणं हे श्रीमंत देशाचं लक्षण मूळीच नाही', हे सांगणारा हा अहवाल एकदा नजरेखालून घालाच
Intresting Facts : जगभरात इंग्रजी भाषिकांची संख्या अगणित आहे. बऱ्याच वेळा असं मानलं जातं की ज्या देशातील लोक फाडफाड इंग्रजी बोलतात, तो देश झटपट विकसित होतो आणि इंग्रजी बोलता येणं हे एखाद्या देशाला महासत्ता बनवण्यात फायदेशीर ठरते. पण ही समजूत अतिशय चुकीची असल्याचे नुकतंच एका अभ्यासातून समोर आले आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे देशातील दुसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता मानल्या जाणाऱ्या चीनमध्ये केवळ 0.5 टक्के लोकांनाच इंग्रजी बोलता येतं. तसेच, सध्या आर्थिक दिवळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानमध्ये हा टक्का भारतापेक्षा ६ पटीने जास्त आहे.
भारतात प्रामुख्याने भाषेच्या संदर्भात लोकांचा असा समज आहे की, इंग्रजी ही भाषा केवळ व्यापार करण्यासाठी, हिंदी व्यवहारासाठी तर मातृभाषेचा उपयोग भाषिक संस्कारासाठी केला गेला पाहिजे. केवळ इंग्रजी भाषेला यशाची गुरुकिल्ली समजणाऱ्यांसाठी हे गंमतीदार तथ्य त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेमध्ये देखील लोक अपेक्षित प्रमाणात इंग्रजी बोलत नाहीत. अशीच काहीशी स्थिती इंग्रजीचे उगमस्थान असलेल्या इंग्लंडमध्ये आहे. यूकेमध्ये देखील इंग्रजी भाषिकांचे प्रमाण तुलनेने खूप कमी आहेत.
चीनमध्ये इंग्रजी बोलणाऱ्यांचा टक्का सर्वात कमी- जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये इंग्रजी बोलणाऱ्यांचा आकडा सर्वात कमी आहे. आर्थिक तंगीत सापडलेल्या पाकिस्तानचे लोक हे झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था असलेल्या भारतीयांपेक्षा चांगलं इंग्रजी बोलतात असे अभ्यासात समोर आले आहे. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे, बारबोडोस आणि जिब्राल्टर यांसारखे क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोट्या असणाऱ्या देशांमध्ये इंग्रजी भाषिकांचे प्रमाण हे १०० टक्के आहे.
क्रिस्टल, यूरोबॅरोमीटर, अमेरिकी जनगणना ब्यूरो, मिक्रोजेंसस, ब्रिटीश काउंसिल आणि इफ जनगणना यांच्यानुसार, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त 10.5 लोकांना चांगले इंग्रजी बोलता येते. याउलट भारताच्या शेजारील राष्ट्र असलेल्या बांगलादेशमध्ये 12 % लोक उत्तम इंग्रजी बोलतात. या सर्व देशांच्या तुलनेत पाकिस्तान हा बांगलादेश आणि भारताच्या खूप पुढे आहे. पाकिस्तानातील 49% ते 58% लोक उत्तम इंग्रजी बोलतात असा निष्कर्ष अभ्यासात पुढे आला आहे.
चला तर मग जाणून घेऊया लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक इंग्रजी बोलणाऱ्या देशांची टक्केवारी:
चीन -0.5%
ब्राजील-5%
रूस-5%
अर्जेंटीना-6.52%
भारत-10.5%
बांग्लादेश-12%
मेक्सिको-12.9%
तुर्की-17%
स्पेन-22%
दक्षिण आफ्रिका-31%
इटली-34%
पाकिस्तान-49-58%
ग्रीस-51%
नाइजिरीया-53-60%
जर्मनी-56%
फ्रांस-57%
फिलीपींस-58%
बेल्जिअम-60%
ऑस्ट्रिया-73%
फिनलॅंड-75%
कनाडा-83%
डेनमार्क-86%
स्वीडन-89%
नॉर्वे-90%
ऑस्ट्रेलिया-92.8%
यूएसए-95.5%
सिंगापूर-96.43%
न्यूजीलंड-97.82%
यूके-98.3%
आयरलॅंड-98.37%
बारबाडोस-100%
जिब्राल्टर-100%