पाकिस्तानातील तरूणीने मोदी सरकारकडे मागितली स्पेशल परमिशन, भारतीय तरूणाच्या पडली प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 02:54 PM2021-06-28T14:54:19+5:302021-06-28T14:55:35+5:30

पाकिस्तानातील एका तरूणीने मोदी सरकारला विनंती केली आहे की, तिला भारतीय व्हिसा दिला जावा. कारण तिला इथे येऊन तिच्या प्रियकरासोबत लग्न करायचं आहे.

Pakistani girl appeals modi govt to give special visa to marry Indian boyfriend | पाकिस्तानातील तरूणीने मोदी सरकारकडे मागितली स्पेशल परमिशन, भारतीय तरूणाच्या पडली प्रेमात

पाकिस्तानातील तरूणीने मोदी सरकारकडे मागितली स्पेशल परमिशन, भारतीय तरूणाच्या पडली प्रेमात

Next

असं म्हणतात की, प्रेम कुणावरही होऊ शकतं. त्यात ना जात पाहिली जात ना धर्म. इतकंच काय तर प्रेमाला कोणत्याही सीमा रोखू शकत नाही. अशीच एक घटना पाकिस्तानातून समोर आली आहे. पाकिस्तानातील एका तरूणीने मोदी सरकारला विनंती केली आहे की, तिला भारतीय व्हिसा दिला जावा. कारण तिला इथे येऊन तिच्या प्रियकरासोबत लग्न करायचं आहे.  याा तरूणीचा बॉयफ्रेन्ड हा भारतीय नागरिक आहे.

दीड वर्षाआधी झालं होतं प्रेम

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या कराचीमध्ये राहणारी सुमन रंतीलाल ही आजपासून दीड वर्षापूर्वी भारतात राहणाऱ्या अमित नावाच्या तरूणाच्या प्रेमात पडली होती. दीड वर्षापासून त्यांचं प्रेम प्रकरण सुरू आहे. सुमनने मोदी सरकारकडे सीमा करण्यासाठी स्पेशल परमिशन मागितली आहे. 

का मिळाला नाही व्हिसा?

सुमन एक शिक्षिका आहे. सद्या ती MPhil करत आहे. सुमनने पाकिस्तानमध्ये असलेल्या भारतीय अॅम्बसीकडे ट्रॅव्हल व्हिसासाठी आवश्यक ती कागदपत्रेही सादर केली आहेत. मात्र, कोरोना व्हायरस महामारीमुळे तिला व्हिसा मिळत नाहीये.

फेसबुकद्वारे झाली होती ओळख

सुमनचा बॉयफ्रेन्ड पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्याच्या श्री हरगोविंदपूरमध्ये राहतो. २०१९ मध्ये सुमन आणि अमितची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. नंतर दोघे प्रेमात पडले आणि आता दोघांना आयुष्यभरासोबत रहायचं आहे. 

दरम्यान मार्च २०२० पासून कोरोना व्हायरसमुळे भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा हवाई प्रवास रोखण्यात आला आहे. या कारणानेच सुमन बॉयफ्रेन्डला भेटण्यासाठी भारतात येऊ शकत नाहीये.
 

Web Title: Pakistani girl appeals modi govt to give special visa to marry Indian boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.