पाकने सौदी अरबचे प्रिन्स सलमान यांना गिफ्ट म्हणून दिली महागडी बंदूक!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 11:10 AM2019-02-22T11:10:04+5:302019-02-22T11:12:31+5:30
सौदी अरबचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले होते. त्याआधी प्रिन्स पाकिस्तान दौऱ्यावरही हेले होते.
सौदी अरबचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले होते. त्याआधी प्रिन्स पाकिस्तान दौऱ्यावरही हेले होते. तिथे त्यांना पाकिस्तानकडून एक गोल्ड प्लेटेड सबमशीन गन गिफ्ट म्हणून देण्यात आली. एखाद्या राष्ट्राध्यक्षाला एका देशाकडून अशाप्रकारे बंदूक गिफ्ट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. जेव्हाही एका देशाचा राष्ट्राध्यक्ष दुसऱ्या देशात दौऱ्यावर जातो तेव्हा तो देश पाहुण्यांना काहीतरी गिफ्ट देतातच. पाकमध्ये गिफ्ट म्हणून गन देण्यात आली.
जर्मन इंजिनिअर ने तयार केली गन
रिपोर्टनुसार, हेकलर अॅन्ड कोड एमपी५ एक सबमशीन गन आहे. ही गम एका जर्मन इंजिनिअरने तयार केली आहे. ही गन सोन्याच्या डिझाइनने मॉडिफाय करण्यात आली आहे. पाकमध्ये प्रिन्सला या गनसोबतच आणखी एक पोट्रेटही गिफ्ट करण्यात आलं आहे.
दोन्ही देशात करार
या भेटीदरम्यान पाकिस्तान आणि सौदी अरब यांच्यात २० बिलियन डॉलरच्या गुंतवणूकीचा करार करण्यात आलाय. त्यासोबतच सौदी प्रिन्सने घोषणा केली की, ते त्यांच्या तुरूंगातील २ हजार पाक कैद्यांची सुटका करतील.
Prime Minister @ImranKhanPTI and HRH Crown Prince Mohammad bin Salman witnessing the signing of MoUs in Islamabad.#CrownPrinceinPakistanpic.twitter.com/s1bn4g6kTv
— PTI Rwp Official (@PTIOfficialRWP) February 18, 2019
पाकिस्तानकडून प्रिन्स सलमानचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. त्यांनी प्रिन्स सलमान यांच्या स्वागतासाठी २१ तोफांची सलामी दिली.