पॅरालिसीसमुळे 12 वर्षापासून बेडवर होता, ब्रेनमध्ये चिप लावताच धावू लागला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 03:13 PM2023-05-25T15:13:19+5:302023-05-25T15:20:48+5:30

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, गर्ट-जान ओस्कम नावाच्या या व्यक्तीला उभं राहून चालताना आणि पायऱ्या चढतानाही दाखवलं आहे. एक्सपर्टनुसार, चीनमध्ये काम करताना ओस्कम अपघाताचा शिकार झाला होता.

Paralysed man walking for the first time in 12 years after implants brain chips mind reading device | पॅरालिसीसमुळे 12 वर्षापासून बेडवर होता, ब्रेनमध्ये चिप लावताच धावू लागला!

पॅरालिसीसमुळे 12 वर्षापासून बेडवर होता, ब्रेनमध्ये चिप लावताच धावू लागला!

googlenewsNext

काही दिवसांआधी एक बातमी आली होती की, अमेरिकेच्या एका कंपनीने 50 लोकांच्या मेंदुमध्ये चिप बसवली. सायंटिस्टचा दावा आहे की, याने आंधळेपणा, बहिरेपणा, पॅरालिसीस, डिप्रेशनसहीत अनेक आजारांवर उपचार केला जाऊ शकतो. याचे रिझल्ट अजून येणं बाकी आहे. यादरम्यान एक आणखी चमत्कार झाला. नेदरलॅंडमध्ये 40 वर्षीय एका व्यक्तीला लखवा मारला गेला होता. 12 वर्षापासून तो बेडवर होता. अजिबात पाय हलवू शकत नव्हता. तो अचानक चालू लागला. समोर आलं की, सायंटिस्टने त्याच्या मेंदुत चिप बसवली. ज्यामुळे तो त्याच्या मेंदुवर नियंत्रण ठेवू शकत आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, गर्ट-जान ओस्कम नावाच्या या व्यक्तीला उभं राहून चालताना आणि पायऱ्या चढतानाही दाखवलं आहे. एक्सपर्टनुसार, चीनमध्ये काम करताना ओस्कम अपघाताचा शिकार झाला होता. त्याच्या मणक्यात जखम झाली होती. यामुळे चालणं फिरणं तर दुरच पण त्याला पायही हलवता येत नव्हता. त्याला लकवा मारला गेला होता. यानंतर न्‍यूरोसाइंटिस्‍ट ग्रेगोइरे कोर्टाइनच्या रिसर्चवर काम केलं गेलं.

सायंटिस्‍टच्या एका टीमने त्याचं मेंदु आणि मनाशी तुटलेलं कनेक्शन सुरू करण्यासाठी मेंदु आणि मणक्याच्या हाडात वायरलेस डिजिटल ब्रिज विकसित करण्यावर काम केलं. त्यांनी ओस्कमच्या मेंदुत एक इलेक्‍ट्रॉनिक मशीन फिट केली. रिसर्चचे लेखक प्रोफेसर जॉक्लीने बलोच म्हणाले की, जेव्हा आपण चालण्याबाबत विचार करतो तेव्हा हे उपकरण मेंदुद्वारे तयार झालेले संकेत डिकोड करतं. मग मेंदुतून आलेले संकेत मणक्यात इलेक्‍ट्रॉनिक कम्‍युनिकेशनच्या माध्‍यमातून पाठवले जातात. याने मांसपेशी अॅक्टिव होतात आणि मग पाय पुन्हा संकेत मिळून मुव्हमेंट करू लागतात.

सगळ्यात चांगली बाब ही आहे की, ही सिस्टीम वायरलेस पद्धतीने काम करते. ज्यामुळे रूग्णाला स्वतंत्रपणे इकडे-तिकडे फिरता येतं. गर्ट-जानच्या मेंदू आणि मणक्यात इम्प्लांट लावण्यात आल्यानंतर सिस्टीमला कॅलिब्रेट करण्यास काही मिनिटे लागली. सिस्टीमने गर्ट-जानला उभं राहणं, चालणं आणि पायऱ्या चढण्याची अनुमती दिली आहे. वैज्ञानिकांसाठी हा फार आनंदाचा क्षण आहे. 

Web Title: Paralysed man walking for the first time in 12 years after implants brain chips mind reading device

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.