इथे लग्नाआधीच तरूणी करतात मधुचंद्र, वडिलच मुलीसाठी बनवतो झोपडी; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 12:12 PM2024-01-20T12:12:29+5:302024-01-20T12:18:39+5:30
आश्चर्याची बाब म्हणजे केवळ एका तरूणासोबत नाही तर तरूणी हव्या तेवढ्यांसोबत संबंध ठेवू शकते.
तुम्ही जगातल्या अनेक विचित्र प्रथा आणि रितीरिवाजांबाबत ऐकलं असेल. काही देशांमधील आदिवासी समाजांमध्ये तर फारच अजब प्रथांचं पालन केलं जातं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विचित्र प्रथेबाबत सांगणार आहोत. प्रथेनुसार इथे एक वडिलच आपल्या मुलीला लग्नाआधी तरूणासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची अनुमती देतो. आश्चर्याची बाब म्हणजे केवळ एका तरूणासोबत नाही तर तरूणी हव्या तेवढ्यांसोबत संबंध ठेवू शकते. यासाठी घरापासून दूर तिच्यासाठी वडिलच एक लव्ह हट तयार करतो. जिथे मुलगी पार्टनरसोबत राहते. चला जाणून घेऊ या अजब परंपरेबाबत...
आई-वडील मुलीसाठी बनवतात झोपडी
सामान्यपणे कोणत्याही आई-वडिलांना हेच वाटत असतं की, त्यांची मुलं लग्नाआधी अशा लैंगिक संबंधाच्या फंद्यात पडू नये. पण कंबोडियाच्या क्रांग जमातीतील लोक स्वत: आपल्या मुलींना लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी देतात आणि मुलींसाठी ते आनंदाने एक लव्ह हटही तयार करतात. जिथे राहून ती पार्टनर भेटू शकेल आणि संबंध बनवू शकेल.
काय आहे यामागचं कारण?
कंबोडियाच्या उत्तर-पूर्व भागात क्रांग जमातीतील लोक आपल्या मुलीला योग्य साथीदार मिळावा म्हणून या प्रथेचं पालन अनेक वर्षांपासून करतात. त्यांचं असं मत असतं की, याने मुलींना फायदा होतो आणि मुली सशक्त होतात. इथे मुली एकाच तरूणासोबत नाही तर अनेकांना भेटू शकते आणि इच्छा असेल तर त्यांच्यासोबत संबंध ठेवू शकते. नंतर ती त्यांच्यापैकी एका तरूणासोबत लग्न करते.
या जमातीच्या प्रथेनुसार, जशी मुलीची मासिक पाळी सुरू होते, त्यांसाठी घरापासून काही अंतरावर एक झोपडी बनवली जाते. ज्याला लव्ह हट असंही म्हणतात. इथे तरूणी समाजातील इतर मुलांना भेटू शकतात आणि संबंधही ठेवू शकतात. यादरम्यान जर तरूणी गर्भवती झाली तर ज्या मुलाला ती पसंत करते त्याच्याशी ती लग्न करू शकते. तरूणाला त्या बाळाला आपलं नाव द्यावं लागतं. भलेही ते त्याचं नसेल तरी.
महत्वाची बाब म्हणजे ही एकमेव जमात अशी नाही की, जिथे महिला किंवा तरूणी लग्नाआधी संबंध ठेवू शकतात. असे अनेक समाज आहेत ज्यांच्यात लग्नाआधी संबंध ठेवणं चुकीचं मानलं जात नाही. यामागे त्यांच्या वेगवेगळ्या मान्यताही असतात.