पाळीव पोपटानं 'असं' काही केले, ज्यानं मालकाला २ महिने जेल अन् ७४ लाखांचं नुकसान झालं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 04:59 PM2023-02-01T16:59:36+5:302023-02-01T16:59:50+5:30

२०२० मध्ये झालेल्या या घटनेच्या सुनावणीनंतर कोर्टानं पाळीव पोपटाचे मालक हुआंगवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला

Parrot Owner Fined ₹ 74 Lakh After Bird Injures Doctor In Taiwan | पाळीव पोपटानं 'असं' काही केले, ज्यानं मालकाला २ महिने जेल अन् ७४ लाखांचं नुकसान झालं

पाळीव पोपटानं 'असं' काही केले, ज्यानं मालकाला २ महिने जेल अन् ७४ लाखांचं नुकसान झालं

Next

घरात पोपट पाळण्याची हौस बऱ्याच जणांना असते. परंतु याच पाळीव पोपटामुळे एका व्यक्तीला जेलमध्ये जावं लागले आहे. इतकेच नाही तर पोपटाच्या मालकाला ७४ लाख रुपये दंडही भरावा लागला आहे. पोपटामुळे एक डॉक्टर घसरून पडले आणि त्यांची हाडे मोडली. कमरेच्या हाडाला दुखापत झाली. त्यामुळे वर्षभर डॉक्टरला बेडवरच पडून राहावं लागले. त्यामुळे या डॉक्टरनं पोपटाच्या मालकाविरोधात थेट कोर्टात धाव घेतली आणि कोर्टानेही या प्रकरणाचा निकाल सुनावला. 

ही घटना तैवानची आहे. देशाच्या सेंट्रल न्यूज एजेन्सीनुसार, पाळीव पोपटाने एका डॉक्टरला जखमी केले. त्यामुळे पोपटाचा मालक हुआंगवर ९१ हजार ३५० डॉलर(७४ लाख) दंड ठोठावण्यात आला. त्याशिवाय त्याला २ महिने जेलची हवाही खावी लागणार आहे. पाळीव पोपटामुळे डॉक्टरच्या कमरेचं हाड मोडले. ही घटना डॉक्टर पार्कमध्ये जॉगिंगला गेले असताना घडली. अचानक एक पोपट आला आणि डॉक्टरच्या खांद्यावर बसून फडफडायला लागला. हे पाहून डॉक्टर घाबरले आणि जमिनीवर घसरले. यात ते जखमी झाले त्यानंतर उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलला नेले. 

या प्रकारानंतर डॉक्टर लिन यांनी पाळीव पोपटाचे मालक हुआंग यांच्यावर कोर्टात केस दाखल केली. कोर्टात लिन यांनी म्हटलं की, या घटनेनंतर वर्षभर मला बेडवर पडून राहावे लागले. त्यामुळे मला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्याचसोबत माझ्या उपचारासाठीही खूप पैसे खर्च झाले. या प्रकरणी कोर्टात वकीलांनी हे दुर्मिळ प्रकरण आहे. मागील एक दशकात कोर्टात झालेल्या सुनावणींच्या वेगळे आहे असं सांगितले. 

२०२० मध्ये झालेल्या या घटनेच्या सुनावणीनंतर कोर्टानं पाळीव पोपटाचे मालक हुआंगवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला. त्यामुळे डॉक्टर लिन जखमी झाले असा निष्कर्ष काढला. पोपटाच्या मालकाला सुरक्षात्मक उपाय करायला हवे होते. जेलची शिक्षा ही नकळतपणे दुखापत पोहचवल्यामुळे करण्यात आली आहे. तर दंड पीडित व्यक्तीला झालेल्या आर्थिक नुकसानापोटी देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. तर कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान ठेवतो. परंतु मी या निर्णयाविरोधात अपील करणार आहे. पोपट आक्रमक नव्हता आणि नुकसान भरपाईची रक्कम खूप अधिक आहे असा युक्तिवाद पाळीव पोपटाच्या मालकाने मांडला. 

Web Title: Parrot Owner Fined ₹ 74 Lakh After Bird Injures Doctor In Taiwan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.