जगातील सर्वात महागडं घड्याळ; किंमत ऐकून डोळे चक्रावतील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 03:53 PM2019-11-13T15:53:32+5:302019-11-13T15:55:37+5:30

जगातील सर्वात महागड्या घड्याळीची किंमत तब्बल 222 कोटी रुपये आहे.

patek philippe sold world most expensive watch grandmaster chime | जगातील सर्वात महागडं घड्याळ; किंमत ऐकून डोळे चक्रावतील

जगातील सर्वात महागडं घड्याळ; किंमत ऐकून डोळे चक्रावतील

googlenewsNext

नवी दिल्ली - बाजारात आकर्षक आणि महागडी घड्याळं उपलब्ध आहेत. मात्र कोट्यावधी किंमतीचं घड्याळ आहे असं जर कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे. जगातील सर्वात महागड्या घड्याळीची किंमत तब्बल 222 कोटी रुपये आहे. स्वित्झर्लंडमधील लक्झरी वॉच निर्माता कंपनी Patek Philippe ने एका घड्याळाचा लिलाव केला. 31 मिलियन स्विस फ्रँक म्हणजेच जवळपास 222 कोटी रुपयांना हे घड्याळ विकलं. चॅरिटीसाठी हा लिलाव करण्यात आला होता. नंतर सर्व रक्कम दान करण्यात आली आहे. 

जिनेव्हामध्ये Only Watch नावाने चॅरिटीचं आयोजन  करण्यात आलं होतं. पाटेक फिलिपचं घड्याळ Grandmaster Chime 6300A-010 खास चॅरिटी लिलावासाठीच तयार करण्यात आलं होतं. फक्त पाच मिनिटं हा लिलाव चालला. 2.5 ते 3 मिलियन स्विस फ्रँकमध्ये हे घड्याळ विकलं जाऊ शकेल अशी आशा होती. याआधी Daytona Rolex नावाच्या घडाळ्याने सर्वाधिक महागड्या किंमतीचा मान मिळवला होता. 2017 मध्ये 17.8 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 127 कोटी रुपयांमध्ये त्याची खरेदी करण्यात आली होती.

घड्याळात वेळ दाखवण्यासोबतच विविध प्रकारचे 20 फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये एक रिंगटोन, एका मिनिटांचा रिपीटर, चार अंकी डिस्प्ले असलेले खास कॅलेंडर, सेकंड टाईम झोन आणि 24 तासांसह मिनिट सबडायल यांसारखे हायटेक फीचर्स देण्यात आले आहेत. या घड्याळ्याचे सर्वात खास फीचर म्हणजे फ्रंट आणि बॅक डायल सांगितलं जातं. यामध्ये सॅमन आणि ब्लॅक असे दोन कलर देण्यात आले आहेत. 

जेव्हा नशीब चमकतं तेव्हा एखाद्याचं आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. अशीच एक घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. इथे एका व्यक्तीने एका चॅरिटी शॉपमधून 90 रूपयांना एक फूलदानी खरेदी केली होती. नंतर त्याला समजलं की, ही फूलदानी 300 वर्ष जुनी आहे. तर त्याने याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आणि एका चीनी व्यक्तीने ही फूलदानी तब्बल 484 पाउंड म्हणजेच 4.4 कोटी रूपयांना खरेदी केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही फूलदानी 300 वर्ष जुनी असून 18 व्या शतकातील एका चीनी शासकाचा याच्याशी संबंध आहे. त्यामुळे ही फूलदानी खास झाली आहे. या फूलदानीवर 1735 ते  1796 पर्यंत चीनवर शासन करणारे सम्राट कियानलोंग यांच्याशी संबंधित चिन्ह आहेत.
 

Web Title: patek philippe sold world most expensive watch grandmaster chime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.