१७ वर्षीय तरूणाच्या जबड्यातून डॉक्टरांनी काढले ८२ दात, ट्यूमरमुळे तयार झाला होता दातांचा गोळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 01:39 PM2021-07-10T13:39:49+5:302021-07-10T13:42:47+5:30
नितीश कुमार असं या १७ वर्षीय रूग्णांचं नाव असून गेल्या पाच वर्षांपासून त्याला 'कॉम्प्लेक्स ओडोन्टोम' हा जबड्याचा एक दुर्मिळ ट्युमर होता.
आपणा सर्वांनाच माहीत आहे की, आपला तोडांता किती दात असतात. कुणीही याचं ३२ असं सहजपणे उत्तर देतील. पण आम्ही जर तुम्हाला म्हणालो की, एका तरूणाच्या तोंडातून ३२ नाही तर तब्बल ८२ दात काढले तर तुमचा विश्वास बसणार नाही. होय, ही सत्य घटना आहे. एका दुर्मिळममध्ये हे दात होते (Teeth in tumor). तरूणावर पटण्यामध्ये यशस्वी सर्जरी करण्यात आली.
नितीश कुमार असं या १७ वर्षीय रूग्णांचं नाव असून गेल्या पाच वर्षांपासून त्याला 'कॉम्प्लेक्स ओडोन्टोम' हा जबड्याचा एक दुर्मिळ ट्युमर होता. ज्यामुळे त्याला अनेक अडचणी येत होत्या. पाटण्यातील IGIMS मध्ये त्याच्यावर यशस्वी सर्जरी करण्यात आली. सर्जरी करून त्याच्या जबड्यातील ट्युमर बाहेर काढण्यात आला. त्यात तब्बल ८२ दात होते.
IGIMS मधील डॉ. मनीष मंडल यांनी सांगितलं, "आरा जिल्ह्यातील १७ वर्षांचा नितीश कुमार ५ वर्षांपासून कॉम्प्लेक्स ओडोन्टोम या जबड्याच्या दुर्मिळ ट्युमरने ग्रस्त होता. अनेक ठिकाणी उपचार घेऊनही त्याची ही समस्या दूर झाली नाही. योग्य उपचार न मिळाल्याने तो IGIMS मध्ये आला होता. त्याचवेळी टेस्ट केल्यावर त्याला कॉम्प्लेक्स ओडोन्टोम हा दुर्मिळ ट्युमर असल्याचं निदान झालं".
देशातील ही अशी पहिलीच घटना आहे. त्यामुळे सुरूवातीला डॉक्टरही हैराण झाले होते. मात्र, त्यांनी नितीश कुमारवर यशस्वी सर्जरी केला. आता नितीश बरा आहे. त्याच्या दोन्ही गालाच्या खालच्या बाजूला आणि मानेच्या वर दोन्ही दिशेने असे हे ट्युमर होते. डॉ. प्रियंकर सिंह आणि डॉ. जावेद इकबाल यांनी सांगितलं, "जबड्याचा हा एक असामान्य असा ट्युमर आहे. हा ट्यूमर होण्याचं कारण म्हणजे आनुवंशिक किंवा जबड्याला हानी पोहोचल्यामुळे जबडा किंवा दातांचा विकास होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्यानेही होऊ शकतो".