साधा रिक्षावाला पण आता झाला एका रात्रीत जागतिक स्तरावर प्रसिद्ध, काय केलं त्याने? एकदा वाचाच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 07:09 PM2021-09-06T19:09:11+5:302021-09-06T19:11:41+5:30
वाचाल तर वाचाल असं म्हणतात. पण वाचाल तर जगप्रसिद्ध व्हाल अशी नवी म्हण आता रुढ होण्याची शक्यता आहे. केरळ मधला एक रिक्षावाला याच कारणामुळे रातोरात आंतराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालाय. काय केलंय त्याने असं वाचा पुढे...
वाचाल तर वाचाल असं म्हणतात. पण वाचाल तर जगप्रसिद्ध व्हाल अशी नवी म्हण आता रुढ होण्याची शक्यता आहे. केरळ मधला एक रिक्षावाला याच कारणामुळे रातोरात आंतराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालाय. काय केलंय त्याने असं वाचा पुढे...
Kerala, India (thank you very much for the photo) pic.twitter.com/13IdqKwsMo
— Paulo Coelho (@paulocoelho) September 4, 2021
केरळमधील एका ऑटोवर Paulo Coelho असे लिहून खाली मल्याळममध्ये लिहिले आहे की, ‘अल्केमिस्ट’ आता या ऑटोचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या पुस्तकाचे लेखक लेखक Paulo Coelho यांनी स्वत: हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “केरळ, भारत (फोटोसाठी खूप खूप धन्यवाद).” Paulo Coelho हे सर्वात प्रसिद्ध लेखकांपैकी एक आहेत, त्यांची पुस्तके जगभरात प्रचंड वाचली जातात.
फोटोमध्ये दिसणाऱ्या ऑटोच्या नंबर प्लेटवरून दिसून येते की हा ऑटो एर्नाकुलमच्या आऱटीओ प्राधिकरणाकडे नोंदणीकृत आहे. ऑटोरिक्षा मालक केए प्रदीप ट्विटरवर नाहीत. पण जेव्हा त्यांच्या मित्रांनी त्याला त्याच्या ऑटो ट्वीटबद्दल सांगितले, तेव्हा त्यांना अत्यंत आनंद झाला. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट पाहून अनेकांनी प्रदीपची स्तुती करायला सुरुवात केली. एका मीडिया रिपोर्टनुसार, प्रदीपला पुस्तके वाचण्याची आवड आहे. या छंदामुळे ५५ वर्षीय प्रदीपने Paulo Coelho या जगप्रसिद्ध लेखकाची १० पुस्तके वाचली आहेत. प्रदीप २५ वर्षांपासून ऑटोरिक्षा चालवत आहेत.
जेव्हा प्रदिप यांच्या ऑटोचा फोटो व्हायरल झाला, तेव्हा प्रदीप हे खूप आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले की, “माझ्यासाठी हा खुप मोठा आश्चर्याचा धक्का होता. माझ्या आवडत्या लेखकाने माझ्या ऑटोरिक्षाबद्दल ट्विट केले हे जाणून मला खूप आनंद झाला आहे. ”तसेच, प्रदीप यांनी Paulo Coelho यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली!