विद्यार्थी उशिरा आल्यास पालकांना दंड
By admin | Published: July 5, 2017 01:07 AM2017-07-05T01:07:33+5:302017-07-05T01:07:33+5:30
इंग्लडमधील एसेक्स, हॅम्पशायर आणि वेस्ट मिडलँडस येथील शाळा विद्यार्थी शाळेत संपूर्ण दिवस आलाच नाही तर त्याच्या पालकांना ठराविक
इंग्लडमधील एसेक्स, हॅम्पशायर आणि वेस्ट मिडलँडस येथील शाळा विद्यार्थी शाळेत संपूर्ण दिवस आलाच नाही तर त्याच्या पालकांना ठराविक रकमेचा दंड ठोठावतात. आता तर शाळा आणखी पुढे गेल्या आहेत. विद्यार्थी वर्गात वारंवार अर्ध्या तासापेक्षा जास्त उशिरा आला तर आणखी दंड त्या आकारणार आहेत. इतरही स्थानिक परिषदांच्या शाळातं विद्यार्थी उशिरा आला की त्याच्या पालकांना दंड ठोठावण्याचा विचार करीत आहेत. वॉरविकशायर परगण्याच्या परिषदेने म्हटले आहे की विद्यार्थी सातत्याने अर्धा तास उशिरा येत असेल तर त्याच्या पालकांना आर्थिक दंड सोसावा लागेल. एसेक्समधील विंटर गार्डन अकॅडमीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना सांगण्यात आले आहे की सकाळी नऊ नंतर तुमची मुले पुन्हापुन्हा उशिरा येत असतील तर ६० पौंड दंड भरावा लागेल. हा दंड २१ दिवसांत न भरल्यास तो १२० पौंड होईल.
शाळांच्या धोरणांचे अभ्यासक टॉम बेनेट म्हणाले की, शाळेच्या मैदानावरील कचरा, च्युर्इंग गोळा करण्याचे काम विद्यार्थ्यांकडून करून घेणे शाळांना शक्य आहे. पैशांचा दंड हा शेवटचा उपाय असून, तो शक्यतो टाळायला हवा.