लक्झरी कारपेक्षाही महागडा आहे हा 2 इंचाचा कीटक, जाणून घ्या यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 12:26 PM2023-02-04T12:26:44+5:302023-02-04T12:27:14+5:30

World Most Expensive Insect: एक असाही जीव आहे जो सापडला तर  तुम्ही लगेच कोट्याधीश होऊ शकता. हा एक छोटासा कीटक बाजारात लाखो-कोट्यावधी रूपयांना विकला जाऊ शकतो.

People are buying stag beetle by spending lakhs or crores of rupees know the reason | लक्झरी कारपेक्षाही महागडा आहे हा 2 इंचाचा कीटक, जाणून घ्या यामागचं कारण...

लक्झरी कारपेक्षाही महागडा आहे हा 2 इंचाचा कीटक, जाणून घ्या यामागचं कारण...

googlenewsNext

World Most Expensive Insect: वेगवेगळे प्राणी पाळण्याची जगभरातील लोकांना आवड असते. लोक आपल्या आवडीने श्वान, मांजर, घोडा, गाय, म्हैस किंवा बकरीसोबतच इतरही प्राणी पाळतात. जेव्हा लोक बाजारात हे प्राणी खरेदी करण्यासाठी जातात तेव्हा त्यांची शंभर रूपयांपासून ते हजारो रूपये असते. रेसच्या घोड्याची किंमत अनेकदा कोट्यावधी रूपये असते. पण एक असाही जीव आहे जो सापडला तर  तुम्ही लगेच कोट्याधीश होऊ शकता. हा एक छोटासा कीटक बाजारात लाखो-कोट्यावधी रूपयांना विकला जाऊ शकतो.

स्टॅग बीटल एक खास प्रजातीचा कीटक आहे, ज्याचा आकार केवळ 2 ते 3 इंचाचा असतो. अनेक लोक याला खरेदी करण्यासाठी लाखो-कोट्यावधी रूपये खर्च करतात. या किटकाची जेवढी किंमत आहे तेवढ्या रूपयांमध्ये बीएमडब्ल्यू (BMW) किंवा ऑडी (Audi) सारखी लक्झरी कार तुम्ही घेऊ शकता. 

स्टॅग बीटलला खरेदी करणारे लोक यासाठी 50 लाखांपासून ते 1.5 कोटी रूपयांपर्यंत किंमत देऊ शकतात. या किटकापासून अनेक महागडी औषधं तयार केली जातात. ज्यामुळे याची किंमत इतकी जास्त असते. यामुळेच या किटकाची प्रजाती लुप्त होण्याचा धोका वाढत आहे.

स्टॅग बीटल इतर किटकांच्या तुलनेत वेगळा असतो. त्याला शिंगासारखे दोन अवयव बाहेरच्या बाजूला असतात. 2 स्टॅग बीटलची जेव्हा लढाई होते तेव्हा एखाद्या सुमो पहेलवानासारखे एकमेकांना मागे ढकलण्याचा प्रयत्न करतात. एका स्टॅग बीटलला वयस्क होण्यासाठी केवळ काही आठवड्यांचा वेळ लागतो.  

Web Title: People are buying stag beetle by spending lakhs or crores of rupees know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.