माणसे पिंज-यात, प्राणी बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:54 AM2017-09-15T00:54:22+5:302017-09-15T00:55:17+5:30
प्राणी संग्रहालये तर तुम्ही खूप पाहिले असतील. या ठिकाणी प्राणी पिंज-यात कैद असतात. पण, असेही एक प्राणीसंग्रहालय आहे जे पाहण्यासाठी लोकांना स्वत:ला पिंजºयात कैद करुन घ्यावे लागते. चिलीमधील रँकागुआमध्ये असलेल्या ‘पॅरक्वे सफारी झू’मध्ये वाघ, सिंह, चित्ता, जिराफ, झेब्रा आदी प्राणी आहेत.
Next
प्राणी संग्रहालये तर तुम्ही खूप पाहिले असतील. या ठिकाणी प्राणी पिंज-यात कैद असतात. पण, असेही एक प्राणीसंग्रहालय आहे जे पाहण्यासाठी लोकांना स्वत:ला पिंज-यात कैद करुन घ्यावे लागते. चिलीमधील रँकागुआमध्ये असलेल्या ‘पॅरक्वे सफारी झू’मध्ये वाघ, सिंह, चित्ता, जिराफ, झेब्रा आदी प्राणी आहेत.
पण, या परिसरात हे प्राणी मुक्त आहेत. त्यामुळे एखाद्या वाहनातून पर्यटकांना हे प्राणी संग्रहालय दाखविले जाते. ही वाहने लोखंडी जाळीची आहेत. म्हणजे यात पर्यटकांना बंद केले जाते. वाघ, सिंह या वाहनावर आणि आजूबाजूला अगदी पर्यटकांच्या जवळ येतात. हा अनुभव अतिशय रोमांचकारी आहे.