इथे वर्षानुवर्षे जमिनीखाली राहतात लोक, याला म्हणतात पृथ्वीवरील 'पाताळ लोक'!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 12:38 PM2022-10-27T12:38:28+5:302022-10-27T13:06:59+5:30

एक असं ठिकाण आहे जिथे लोक जमिनीखाली खोलवर घरं तयार करून राहतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं कारणही धक्कादायक आहे. 

People have lived centuries tunisia underground houses | इथे वर्षानुवर्षे जमिनीखाली राहतात लोक, याला म्हणतात पृथ्वीवरील 'पाताळ लोक'!

इथे वर्षानुवर्षे जमिनीखाली राहतात लोक, याला म्हणतात पृथ्वीवरील 'पाताळ लोक'!

googlenewsNext

अनेकदा तुम्ही आजीने सांगितलेल्या कथांमध्ये 'पाताळ लोक'बाबत ऐकलं असेलच. पण हे 'पाताळ लोक' पृथ्वीवरही आहे हे तुम्हाला माहीत आहे का? एक असं ठिकाण आहे जिथे लोक जमिनीखाली खोलवर घरं तयार करून राहतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं कारणही धक्कादायक आहे. 

हा आहे आफ्रिकेच्या ट्यूनिशियातील दजेबेल दाहर परिसर, जिथे लोक आजही शेकडो वर्ष जुन्या घरांमध्ये राहत आहेत. महत्वाची बाब म्हणजे ही घरे जमिनीखाली तयार केलेली असतात. या अंडरग्रांउड गावाला तिज्मा या नावाने ओळखले जाते.

१०० वर्ष जुन्या या घरांमध्ये लोक राहत तर आहेतच, सोबत त्यांनी जगण्यासाठी आवश्यक सर्व सुविधाही इथे तयार केल्या आहेत. इथे राहणारे जास्तीत जास्त लोकांची शेती आजूबाजूला आहे, त्यामुळे ते इथेच राहतात. त्यासोबतच अनेक लोक हा परिसर सोडून शहराकडे गेले आहेत.

जे लोक इथे जमिनीखालील घरात राहतात, त्यांचं म्हणनं आहे की, त्यांना त्यांच्य जमिनीवर आणि संस्कृतीवर प्रेम आहे. त्यामुळे ते ही घरे सोडून जात नाहीत. या घरांच्या आकर्षणाने इथे अनेक पर्यटकही येतात.

ही घरे जमिनीच्या खाली तयार करण्यामागे या परिसरात वाहणारी गरम हवा हे कारण आहे. येथील जास्तीत जास्त घरे ही मातीची तयार केलेली आहेत. त्यामुळे गरमीतही ही घरे थंड राहतात. तसेच हे तयार करताना असे केले जाते की, इथे हवा खेळती रहावी.

Web Title: People have lived centuries tunisia underground houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.