येथे ग्राहकांना जेवल्यानंतर चाटावी लागते रेस्टॉरंटची भींत, आहे अजब नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 03:20 PM2022-06-13T15:20:31+5:302022-06-13T15:22:27+5:30
आज आम्ही तुम्हाला एका अशा रेस्टॉरंटबद्दल सांगणार आहोत, जिथे येणाऱ्या लोकांना जेवणासोबतच तिथे असलेली भिंत चाटण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं.
जगात अनेक अशी वेगवेगळी ठिकाणं आहेत, जिथे त्यांचे स्वतःचे नियम आणि कायदे आहेत. काही ठिकाणी तुम्हाला जेवणासोबत शिव्या दिल्या जातात, तर कुठे उभा राहूनच जेवण करावं लागतं. मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा रेस्टॉरंटबद्दल सांगणार आहोत, जिथे येणाऱ्या लोकांना जेवणासोबतच तिथे असलेली भिंत चाटण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं (Customer Use to Lick Restaurant Wall).
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मात्र हे पूर्णपणे सत्य आहे. अमेरिकेच्या ऍरिझोना राज्यात एक ठिकाण आहे – स्कॉट्सडेल. इथे बांधण्यात आलेल्या द मिशन नावाच्या रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या लोकांना जेवणासोबतच आपल्या जीभेने रेस्टॉरंटची भिंतही चाटून टेस्ट करावी लागते. आता तुम्ही विचार करत असाल की भिंतीत असं काय आहे? चला तर मग आम्ही तुम्हाला या भिंतीची खासियत सांगतो, ज्यामुळे रेस्टॉरंट ग्राहकांना ती चाटण्यासाठी प्रोत्साहित करत असतं.
द मिशन रेस्टॉरंटमधील ही स्वादिष्ट भिंत गेल्या 17 वर्षांपासून बांधली गेली आहे. इथे येणारे लोक एकदा तरी ही भिंत जिभेने चाटून बघतात. वास्तविक ही भिंत पिंक हिमालयन सॉल्ट म्हणजेच गुलाबी मीठापासून बनवली आहे. यामुळेच लोकांना त्याची चव घेण्याची इच्छा होते आणि रेस्टॉरंटचे कर्मचारीही ग्राहकांना असं करण्यापासून थांबवत नाहीत. ओल्ड टाउन स्कॉट्सडेलमध्ये स्थित हे रेस्टॉरंट केवळ आपल्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांसाठीच प्रसिद्ध नाही, तर ते या खास भिंतीसाठी देखील प्रसिद्ध आहे. WLBT3 नुसार, ही भिंत हेडशेफने येथे आणली होती, जी आता लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
तुम्हीही आता विचार करत असाल की इथे येणारे अनेक लोक ही भिंत चाटतात, अशात ते किती रोगांचं कारण बनू शकतं. या प्रश्नाच्या उत्तरात, रेस्टॉरंटचे कर्मचारी सांगतात की ही भिंत हिमालयीन रॉक सॉल्टपासून बनलेली आहे, ज्यामध्ये स्वतःच स्वच्छतेचे गुणधर्म आहेत आणि यामुळे यातून कोणालाही कोणताही रोग होत नाही. असं असलं तरी कर्मचाऱ्यांकडून दररोज भिंतीची स्वच्छता केली जाते