लसूण-कांद्याच्या नावानेही घाबरतात या गावातील लोक, 45 वर्षापासून कुणीच केलं नाही सेवन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 04:31 PM2023-01-26T16:31:32+5:302023-01-26T17:00:00+5:30
ऱJarahatke : आज आम्ही तुम्हाला एका अशा गावाबाबत सांगणार आहोत, जिथे गेल्या 40 ते 45 वर्षापासून कांदा-लसणाचा अजिबात वापर झालेला नाही. गावातील सगळ्याच घरांमधील लोक कांदा आणि लसणाला दूर ठेवतात.
Trending and Viral News: कांद्याचे आणि लसणाच्या वाढत्या-कमी झालेल्या भावाच्या बातम्या आपण नेहमीच वाचत असतो. जास्तीत जास्त घरांमध्ये कांदा आणि लसूण खाल्ला जातो. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये यांचा वापर केला जातो. याने शरीराची इम्युनिटीही वाढते. इतके फायदे असूनही काही लोक कांदा आणि लसूण अजिबात खात नाहीत. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा गावाबाबत सांगणार आहोत, जिथे गेल्या 40 ते 45 वर्षापासून कांदा-लसणाचा अजिबात वापर झालेला नाही. गावातील सगळ्याच घरांमधील लोक कांदा आणि लसणाला दूर ठेवतात. इतकंच काय तर ते कांदा आणि लसूण खरेदीही करत नाहीत.
ज्या गावाबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत ते गाव बिहारच्या जहानाबादच्या जवळ आहे. हे दाव जहानाबाद जिल्हा मुख्यालयापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. या गावाचं नाव आहे त्रिलोकी बिगहा गाव. या गावात साधारण 30 ते 35 घरे आहे. या सगळ्याच घरामध्ये कांदा आणि लसूण खाण्यास सक्त मनाई आहे. येथील लोक कांदा-लसणाशिवाय जेवण करतात.
त्रिलोकी बिगहा गावातील वयोवृद्ध लोक सांगतात की, साधारण 40 ते 45 वर्षाआधी येथील लोकांना कांदा आणि लसूण खाणं सोडलं होतं आणि या परंपरेचं पालन बऱ्याच वर्षापासून लोक करत आहेत. गावातील लोकांनुसार, गावात ठाकुरबाड़ीचं मंदिर (Thakurbadi Temple) आहे. हे मंदिर फार जुनं असून याच मंदिरामुळे गावातील लोकांनी कांदा आणि लसूण खाणं सोडलं आहे.
लोकांची मान्यता आहे की, अनेक लोकांनी ही परंपरा मोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या घरात अनेक समस्या बघायला मिळाल्या. या घटनांनंतर गावातील लोकांनी कांदा-लसूण खाणंच नाही तर बाजारातून विकत घेणंच बंद केलं आहे. केवळ लसूण आणि कांदाच नाही तर या गावात मांस खाणं आणि दारू पिणं यावरही सक्त मनाई आहे. इथे तुम्हाला कुणीही दारू पिताना दिसणार नाही आणि येथील लोकांनी मांस खाणंही सोडलं आहे.