या महिला पोलीस अधिकाऱ्याचं सौंदर्य पाहून लोक अवाक्, स्वत:हून अटक करण्याची करताहेत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 09:45 AM2022-11-21T09:45:56+5:302022-11-21T09:49:17+5:30
People Want To Arrest By Officer: अमेरिकेतील एका महिला पोलीस अधिकाऱ्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ही महिला अधिकारी तिच्या सुंदरतेमुळे चर्चेत आहे.
People Want To Arrest By Officer: सोशल मीडियाता जमाना आल्यापासून लोकांसमोर असे कितीतरी टॅलेंट समोर आले ज्यांबाबत लोकांना काहीच माहीत नव्हतं. अशात अमेरिकेतील एका महिला पोलीस अधिकाऱ्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ही महिला अधिकारी तिच्या सुंदरतेमुळे चर्चेत आहे.
या महिलेचं नाव किम्बर्ली कवरडिल आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ही महिला अमेरिकेच्या अॅरिझोना राज्यातील पोलीस विभागत डेप्युटी पदावर आहे. ती तिच्या मेहनतीने पोलिसात भरती तर झाली, पण सोबतच सोशल मीडियावरही ती आपल्या सुंदरतेने आणि ड्रेसिंग सेन्सने धमाका करत आहे.
रिपोर्ट्सनुसार, तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिने नुकतंच सांगितलं की, लोक स्वत: तिला अटक करण्याची मागणी करत आहेत. हेही खरं आहे की, लोक तिच्या सुंदरतेवर, स्टाइलवर जीव ओवाळतात. तिच्या फोटोंवर कमेंट्स करतात. काही लोकांनी कमेंट केल्या आहेत की, इतकी सुंदर पोलीस अधिकारी असेल ते आनंदाने तुरूंगात जातील.
सध्या लोकांना तिच्याबाबत जाणून घ्यायचं आहे. रिपोर्ट्सनुसार, कवरडिल कॅलिफोर्नियामध्ये तैनात होती. ती लॉस एन्जलिस काउंटी शेरीफ विभागत एका पोलीस इनवेस्टिगेटर होती. तिला सुरूवातीपासूनच एक पोलीस अधिकारी व्हायचं होतं. हे तिच्या आजोबांचं स्वप्न होतं. आता तिची बदली अॅरिझोनामध्ये झाली आहे.