बारमाही कैऱ्या देणारे झाड

By Admin | Published: August 21, 2015 02:42 AM2015-08-21T02:42:26+5:302015-08-21T02:42:26+5:30

येथील गांडेकर वस्तीवरील अमृत गांडेकर यांच्या शेतातील बारमाही (वर्षातून दोन वेळा) कैऱ्यांनी लगडलेले आंब्याचे झाड परिसरात कौतुकाचा

Perennial tree | बारमाही कैऱ्या देणारे झाड

बारमाही कैऱ्या देणारे झाड

googlenewsNext

भोसे (ता. खेड) येथील गांडेकर वस्तीवरील अमृत गांडेकर यांच्या शेतातील बारमाही (वर्षातून दोन वेळा) कैऱ्यांनी लगडलेले आंब्याचे झाड परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे. आकाराने गोल व रंगाने पोपटी असणाऱ्या या आंब्याच्या झाडाची ‘जात’ माहिती नसल्याचेही गांडेकर यांनी सांगितले.
साधारण आठ वर्षांपूर्वी देहू येथील नर्सरीतून आणलेले आंब्याचे रोप गांडेकर यांनी लावले. दुसऱ्याच वर्षीपासून झाडाला कैऱ्या येण्यास सुरुवात झाली. गेल्या सात वर्षांपासून झाडाला कैऱ्या येत आहेत. सध्याही या झाडावर जवळपास अडीचशे ते तीनशे कैऱ्या आहेत. आणखी महिनाभराने आंबे पिकण्यास सुरुवात होईल.

Web Title: Perennial tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.