मिशा असलेली राजकुमारी जिच्यावर फिदा होते लोक, 13 जणांनी तिच्यासाठी दिला होता जीव!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 02:38 PM2024-02-21T14:38:16+5:302024-02-21T14:39:43+5:30

सामान्यपणे सगळ्या राजकुमारी फार सुंदर बघायला मिळतात. पण या राजकुमारीचं सौंदर्य फारच वेगळं होतं. ही राजकुमारी आपल्या मिशांमुळे लोकप्रिय झाली होती.

Persian princess of Gajar with mustache known as epitome of beauty | मिशा असलेली राजकुमारी जिच्यावर फिदा होते लोक, 13 जणांनी तिच्यासाठी दिला होता जीव!

मिशा असलेली राजकुमारी जिच्यावर फिदा होते लोक, 13 जणांनी तिच्यासाठी दिला होता जीव!

Princess of Persia Qajar: सुंदरतेबाबत वेगवेगळ्या व्याख्या सांगितल्या जातात. प्रत्येक व्यक्तीची सुंदरतेची व्याख्या वेगवेगळी असते. कुणाला काही आवडतं तर कुणाला काही. पण प्राचीन काळात एका राजकुमारीची खूप चर्चा झाली होती. कारणही अजब होतं.

सामान्यपणे सगळ्या राजकुमारी फार सुंदर बघायला मिळतात. पण या राजकुमारीचं सौंदर्य फारच वेगळं होतं. ही राजकुमारी आपल्या मिशांमुळे लोकप्रिय झाली होती. तिच्यामागे काही लोक इतके वेडे झाले होते की, त्यातील 13 लोकांनी आत्महत्याही केली होती.

मिशा असूनही ही राजकुमारी अनेक तरूणांची क्रश होती. या 13 तरूणांना जेव्हा तिच्याकडून प्रेम मिळालं नाही तेव्हा त्यांनी मृत्युला कवटाळलं. 19व्या शतकात लठ्ठपणाला सुंदरतेची पहिली पायरी मानलं जात होतं. ईराणच्या या राजकुमारीच्या सुंदरतेचे किस्से आजही ऐकायला मिळतात.

असं म्हणतात की, ईराणची राजकुमारी ताज अल कजर सुल्तानाने तेव्हा सुंदरतेचे सर्व मापदंड मागे सोडले होते. तिला दाट मिशा होत्या आणि तिचे आयब्रोही फार दाट होते. भलेही तिला मिशा होत्या, पण तरी सुद्धा ती तरूणांसाठी आकर्षक होती. ती फार लठ्ठही होती.

असं मानलं जातं की, तरूण राजकुमारी ताज अल कजर सुल्तानाच्या प्रेमात वेडे झाले होते. तरूणांना काहीही करून तिच्यासोबत लग्न करायचं होतं. मात्र, राजकुमारीने सर्व तरूणांचे प्रस्ताव नाकारले. 

राजकुमारीच्या नकारामुळे 13 तरूणांनी आत्महत्या केली होती. तरूणांचे प्रस्ताव नाकारण्यामागे कारणही होतं. राजकुमारीचं लग्न आधीच अमीर हुसैन खान शोजा ए सल्तनेहसोबत झालं होतं. पण तिचे अनेक अफेअर होते.

राजकुमारीच्या अफेअरचे किस्सेही लोकप्रिय आहेत. तिचे अनेक लोकांसोबत अफेअर होते. यात दोन प्रमुख लोक होते. एक म्हणजे अली खान अजीजी अल सुल्तान आणि दुसरा  म्हणजे ईराणी कवि आरिफ काजविनी. 

राजकुमारी पाश्चिमात्य संस्कृतीने फार प्रभावित होती. ती त्यावेळी वेस्टर्न कपडे घालत होती. हिजाब काढून वेस्टर्न कपडे घालणारी ती त्या काळातील पहिली महिला मानली जाते.

Web Title: Persian princess of Gajar with mustache known as epitome of beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.