तेरी मेहरबानिया! २ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या पाळीव कुत्र्याचा मृतदेह पाहिला अन् मालकानं जीव दिला

By Manali.bagul | Published: October 31, 2020 02:02 PM2020-10-31T14:02:25+5:302020-10-31T14:11:32+5:30

एका माणसाचा पाळीव कुत्रा हरवला आणि दोन दिवसांनी तो मृत अवस्थेत सापडला. कुत्र्याच्या मृत्यूचे त्या व्यक्तीला इतके वाईट वाटले की त्याच दिवशी त्याने घरातच लटकून आत्महत्या केली.

Person was hurt by the death of his pet dog committed suicide chhindwara madhya pradesh | तेरी मेहरबानिया! २ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या पाळीव कुत्र्याचा मृतदेह पाहिला अन् मालकानं जीव दिला

तेरी मेहरबानिया! २ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या पाळीव कुत्र्याचा मृतदेह पाहिला अन् मालकानं जीव दिला

googlenewsNext

कुटूंबातील व्यक्तीप्रमाणेच घरातील पाळीव प्राण्याचा प्रत्येकाला लळा लागलेला असतो. पाळीव प्राण्यांशी खेळल्याने दिवसभरातील ताण निघून जातो. याशिवाय प्रसन्न वाटून एक वेगळी उर्जा मिळते. अचानक घरातील पाळीव प्राण्यांना काही झालं तर घरातील सगळ्यांनाच वाईट वाटतं.,अनेकांना मानसिक ताण येतो. कारण पाळीव प्राण्यासोबत झालेलं बॉडिंग सहजासहजी तुटणारं नसतं. कुत्र्याचा विहर सहन न झालेल्या माणसाबाबत धक्कादायक घटना समोर आली आहे. 

एका माणसाचा पाळीव कुत्रा हरवला आणि दोन दिवसांनी तो मृत अवस्थेत सापडला. कुत्र्याच्या मृत्यूचे त्या व्यक्तीला इतके वाईट वाटले की त्याच दिवशी त्याने घरातच लटकून आत्महत्या केली. ही घटना मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील आहे. ही घटना छिंदवाडा येथील कोतवाली पोलिस स्टेशन परिसरातील सोनपूर येथे असलेल्या एका कुटूंबातील आहे. इथे राहत असलेल्या सोमदेव यांनी कुत्र्याच्या मृत्यूनंतर आत्महत्येचं पाऊल उचललं. कुत्र्याच्या मृत्यूनंतर त्यांनी घरातच गळफास लावून आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि गुन्हा दाखल करून  तपासाला सुरूवात केली.

दो दिन से गायब पालतू कुत्‍ता मरा हुआ मिला, मालिक ने गम में दे दी जान.

मृत सोमदेव यांचा मुलगा अमन याने सांगितले की, ''आमच्या घरात एक कुत्रा होता, त्याचा सकाळी मृत्यू झाल्याने वडिलांना दु: ख झाले म्हणून त्यांनी मद्यपान केले. दुपारी 1 वाजता मी कामावरुन घरी परत आल्यावर  पाहिले  तर त्यांनी आपल्या गळ्याला दोरी बांधून गळफास घेतला होता.''

या घटनेची माहिती देताना कोतवाली पोलिस स्टेशनचे प्रभारी मनीषराज भदोरिया म्हणाले की, ''फाशी घेतल्याने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता या व्यक्तीची पूर्ण माहिती मिळाली. त्यांचा कुत्रा २ दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता आणि नंतर मृत अवस्थेत सापडला होता. कुत्र्याचा विरह सहन न झाल्यामुळे आत्महत्या केल्याचे कुटूंबियांनी सांगितले. या घटनेचा सखोल तपास पोलिस करत आहेत. 

दो दिन से गायब पालतू कुत्‍ता मरा हुआ मिला, मालिक ने गम में दे दी जान.

हरवलेल्या कुत्र्यानं २६ दिवस पायपीट करत ६० किमी रस्ता केला पार

आपल्या हरवलेल्या मालकापर्यंत पोहोचण्यासाठी एका कुत्र्याने २६ दिवसात ६० किमीचा रस्ता पार केला आहे. ही घटना चीनमधील आहे. एक  कुटूंब फिरायला गेले असताना ते आपल्या कुत्र्याला विसरून आले. अशावेळी या कुत्र्यानं हिंमत न हारता मालकाला भेटण्यासाठी तब्बल  ६० किलोमीटरचा रस्ता पार केला आहे. काय सांगता! योग्य व्यक्तीच्या शोधात महिलेने १० वेळा केली लग्ने, म्हणाली - भेटला नाही मिस्टर परफेक्ट...

रिपोर्टनुसार चीनच्या हांगू येथे वास्तव्यास असलेले मिस्टर किऊ आणि त्यांचे कुटुंब एका प्रवासासाठी निघाले होते. प्रवासादरम्यान ते एका ठिकाणी थांबले आणि आपल्या कुत्र्याला सोबत न्यायला विसरले. त्यामुळे Dou Dou नावाचा त्याचा कुत्रा मागे राहून गेला.  इतकं सगळं होऊनही कुत्र्यानं हार मानली नाही. जवळपास महिनाभर पायपीट करून कुत्रा अखेर मालकाच्या घरापर्यंत पोहोचला. हा कुत्रा Tong Lu Service station वर थांबला होता. ७ महिन्यांपासून लांब होतं लेकरू; बापानं ३७ तास स्कूटर चालवून चिमुरड्यासाठी गाव गाठलं

या घटनेमुळे प्राणीतज्ज्ञ आणि कुत्र्याचे मालकही हैराण झाले होते. कुत्र्याला पाहिल्यानंतर त्या कुटूंबाचा आनंद  गगनात मावेनाासा झाला होता.  इतक्या दिवसांपासून बाहेर फिरत असल्यामुळे कुत्रा खूप कमकुवत आणि थकलेल्या अवस्थेत होता. शरीरावर  घाण, धुळीचे डाग पडले होते. समोर आलेल्या माहितीनुसार हा कुत्रा जवळपास ७ वर्षापासून 'कियू' यांच्यासोबत राहत होता. अरेरे! लॉकडाऊनमुळे आईची नोकरी गेली; १४ वर्षीय मुलगा रस्त्यावर चहा विकून चालवतोय घर

Web Title: Person was hurt by the death of his pet dog committed suicide chhindwara madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.