धक्कादायक! मजुरीचे पैसे मागितले म्हणून प्रबंधकाने मजुरावर सोडला सिंह आणि....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 12:18 PM2019-10-16T12:18:54+5:302019-10-16T12:26:55+5:30

इथे धार्मिक स्थळाची देखरेख करणाऱ्या व्यक्तीने एका इलेक्ट्रिशिअनवर त्याने मजुरीचे पैसे मागितले म्हणून थेट सिंह सोडला.

Pet lion unleashed on man for demanding wages in Pakistan | धक्कादायक! मजुरीचे पैसे मागितले म्हणून प्रबंधकाने मजुरावर सोडला सिंह आणि....

धक्कादायक! मजुरीचे पैसे मागितले म्हणून प्रबंधकाने मजुरावर सोडला सिंह आणि....

googlenewsNext

(Image Credit : Social Media)

पाकिस्तानमधून नेहमीच काहीना काही विचित्र किंवा धक्कादायक घटना समोर येत असतात. इथे गरीब आणि महिलांवर अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना चर्चेत असतात. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा समोर आली आहे. इथे धार्मिक स्थळाची देखरेख करणाऱ्या व्यक्तीने एका इलेक्ट्रिशिअनवर मजुरीचे पैसे मागितले म्हणून थेट सिंह सोडला. ही घटना लाहोर शहरातील आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका धार्मिक स्थळाचं व्यवस्थापक करणाऱ्या व्यक्तीनेहा धक्कादायक प्रकार केला. त्याच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. असे सांगितले जात आहे की, ९ सप्टेंबरची ही घटना असून इलेक्ट्रिशिअन गंभीर जखमी झाला होता.

पोलिसांनी सांगितले की, पीडित इलेक्ट्रिशिअन रफीक अहमदने घटनेनंतर लगेच व्यवस्थापकाविरोधात पोलिसात लगेच तक्रार दाखल केली नव्हती. कारण त्याने उपचाराचे पैसे आणि मजुरीचे पैसे देण्याचा दावा केला होता. पम एक महिना उलटून गेल्यावरही व्यवस्थापकाने पैसे न दिल्याने मजुराने पोलिसात तक्रार केली.

या तक्रारीनुसार, रफीक अनेक दिवसांपासून अली रजाकडून पैसे मागत होता. यादरम्यान तो एक दिवस आरोपीकडे पैसे मागण्यास गेला तेव्हा अली रजाने त्याच्यावर पाळीव सिंह सोडला. सिंहाने रफीकच्या चेहऱ्यावर आणि हातांवर जखमा झाल्या आहेत. सुदैवाने आजूबाजूने जाणाऱ्या लोकांनी रफीकचा आवाज ऐकला आणि त्याचा जीव वाचवला.


Web Title: Pet lion unleashed on man for demanding wages in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.