नेकेड बाइक राइडमध्ये अंतर्वस्त्र घालण्यास मनाई, पण मास्क घालणं अनिवार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 10:37 AM2021-06-07T10:37:50+5:302021-06-07T10:39:59+5:30
यात सहभागी होणारे महिला-पुरूष आपल्या शरीरावर एकही कपडा घालणार नाहीत. पण त्यांना तोंडावर मास्क लावणं गरजेचं असणार आहे.
अमेरिकेच्या फिलाडेल्फीया शहरात दरवर्षी नेकेड बाइक राइडचं म्हणजे पूर्णपणे नग्न होऊन बाइक राइडचं आयोजन केलं जातं. दरवर्षी शेकडो महिला-पुरूष यात सहभागी होतात. मात्र, यावर्षी हे आयोजन खास असणार आहे. यात सहभागी होणारे महिला-पुरूष आपल्या शरीरावर एकही कपडा घालणार नाहीत. पण त्यांना तोंडावर मास्क लावणं गरजेचं असणार आहे.
म्हणजे याचा अर्थ असा असणार आहे की, हजारोंच्या संख्येने यात सहभागी होणारे लोक ना पॅंट-शर्ट ना कोणताही कपडा अंगावर घालणार. इतकंच काय तर त्यांना अंतर्वस्त्र घालण्याचीही परवानगी नसेल. पण यादरम्यान कोरोना व्हायरस प्रोटोकॉलमुळे सर्वांना तोंडावर मास्क लावणं अनिवार्य असेल. संपूर्ण शरीरावर मास्कशिवाय दुसरा कपडा नसेल.
यावर्षी या खास राइडचं आयोजन २८ ऑगस्टला करण्यात येणार आहे. फिलाडेल्फीयामध्ये कोरोना व्हायरससंबंधी घालण्यात आलेल्या बंदी उठवण्यात आल्या आहेत आणि संक्रमणाचं प्रमाणही कमी झालं आहे. मात्र, अशातही स्थानिक प्रशासनाला कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये. या न्यूड बाइक राइडआधी तिथे वॅक्सीनेशनही वेगाने केलं जात आहे. जेणेकरून राइडआधी जास्तीत जास्त लोकांना वॅक्सीन दिली जावी. (हे पण वाचा : स्पर्म डोनेशनमधून जन्माला आलेल्या तरूणीचे शोधले तिचे ६० भाऊ--बहीण, रिअल 'विक्की डोनर' आहे वडील)
न्यूड बाइक राइडचे आयोजक वेसली नूनान सेसा म्हणाले की, या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या लोकांना मास्क लावण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, त्यांना आशा आहे की, कोरोनासंबंधी नियमांमध्ये येत्या महिन्यात सूट दिली गेली तर कुणाला मास्क लावण्याचीही गरज पडणार नाही.
या खास राइडमध्ये सहभागी लोकांना साधारण १६ किलमीटरपर्यंत बाइक किंवा सायकल चालवायची असते. यात पुरूषच नाही तर महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. दरवर्षी हजारो लोक या राइडमध्ये सहभागी होतात. त्यामुळे आता यावर्षीच्या राइडकडे सर्वांच लक्ष राहणार आहे.