तब्बल १३ वर्षांपासून केली नाही त्याने आंघोळ, जाणून घ्या कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 03:08 PM2019-07-17T15:08:34+5:302019-07-17T15:14:09+5:30
तुम्ही शनिवारी-रविवारी सुट्टी आहे म्हणून आंघोळ न करणारे, कंटाळा आला म्हणून २-४ दिवस आंघोळ न करणार अनेक लोक पाहिले असतील.
(Image Credit : www.pxleyes.com) (प्रातिनिधीक फोटो)
तुम्ही शनिवारी-रविवारी सुट्टी आहे म्हणून आंघोळ न करणारे, कंटाळा आला म्हणून २-४ दिवस आंघोळ न करणार अनेक लोक पाहिले असतील. मात्र, आता तब्बल १३ वर्ष आंघोळ करणारी एक व्यक्ती समोर आली आहे. फिलीपिन्सच्या Cebu मध्ये राहणाऱ्या जूनी इलुस्ट्रिसिमोचं सत्य जाणून घेतल्यावर सर्वजण हैराण झालेत. ३१ वर्षीय जूनी याने गेल्या १३ वर्षांपासून आंघोळच केली नाही.
scoopwhoop.com दिलेल्या वृत्तानुसार, जूनीची मानसिक स्थिती ठीक नाही. त्यामुळे त्याचे पाय लाकडाच्या खाटेला बांधून ठेवण्यात आले आहेत. अशात तो गेल्या ५ वर्षांपासून स्वत:च्या पायावरच उभा झालेला नाही. जूनीची मावशी त्याचा सांभाळ करते. त्याला जेवण, पाणी सगळं बेडवरच दिलं जातं.
फिलिपिन्सच्या स्थानिक टीव्ही शोदरम्यान सांगण्यात आले की, जूनी इलुस्ट्रिसिमो जेव्हा ४ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या आईचं निधन झालं होतं. त्यानंतर त्याचे आजी-आजोबा त्याला सोडून गेले. जूनीने लहान वयातच काम करणं सुरू केलं होतं. मोठा झाल्यावर तो मासेमारीचं काम सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करत होता. यादरम्यानच त्याच्या आजी-आजोबांचं निधन झालं आणि तो मावशीसोबत राहू लागला.
जूनी हा त्याच्या आजी-आजोबांच्या फार जवळ होता. त्यांच्या निधनानंतर त्याला धक्का बसला आणि तो गुमसूम राहू लागला. यातच त्याचं आरोग्य बिघडलं. त्याची अवस्था फारच गंभीर झाली. जेव्हा तो १८ वर्षांचा होता, तेव्हा शेवटची आंघोळ त्याने केली होती.
टीव्ही शोदरम्यान मानसोपचार तज्ज्ञ डॉ. केमिले गार्सिया यांनी सांगितले की, जूनीच्या स्थितीचं कारण त्याच्या आई-वडीलांचं, आजी-आजोबांचं सोडून जाण्याने आलेलं डिप्रेशन असू शकतं. कारण त्याला कमी वयातच या मोठ्या दु:खाचा सामना करावा लागला होता. डॉक्टर म्हणाले की, हा आजार एब्लुटोफोबिया हा असू शकता.
एब्लुटोफोबिया आजारात रूग्णाला आंघोळीची भीती वाटते. या आजारात व्यक्तीच्या मेंदूवर फार वाईट प्रभाव पडतो. यात रुग्ण कोणत्याही अॅक्टिविटी करत नाही.