नवरदेवासमोरच लग्नाचे फोटो डिलीट करून पळून गेला फोटोग्राफर, कारण वाचून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 12:15 PM2021-10-01T12:15:39+5:302021-10-01T12:15:57+5:30
सोशल मीडिया साइट रेडीटवर एका फोटोग्राफरची पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यात त्याने लग्नाच्या दिवसाचा सर्व किस्सा सांगितला. त्याने सांगितलं की, तो काही फोटोग्राफर नाही.
एका फोटोग्राफर त्याच्या मित्राच्या लग्नात फोटोशूटसाठी गेला होता. पण इथे मित्राने त्याला अशी वागणूक दिली की, फोटोग्राफर भडकला. त्याने धडा शिकवण्यासाठी नवरदेवासमोरच लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले. इतकंच नाही तर तो नाराज होऊन लग्नातूनही निघून गेला. अखेर असं काय झालं होतं की, फोटोग्राफरने असं केलं.
सोशल मीडिया साइट रेडीटवर एका फोटोग्राफरची पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यात त्याने लग्नाच्या दिवसाचा सर्व किस्सा सांगितला. त्याने सांगितलं की, तो काही फोटोग्राफर नाही. तो एक डॉग ग्रूमर आहे जो फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कुत्र्यांचे फोटो काढतो. पण माझ्या एक मित्राने कमी बजेट असलेल्या त्याच्या लग्नात मला फोटो काढण्यास सांगितलं. मी त्याला नकार दिला होता, तरी त्याने मला सोबत नेलं.
फोटोग्राफनुसार, २५० डॉलरमध्ये म्हणजे १८ हजार रूपयात लग्नाचे फोटो काढण्याचं ठरलं होतं. लग्नाच्या दिवशी सकाळी ११ वाजता फोटोचं काम सुरू झालं. जे रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होतं. अशात सायंकाळी ५ वाजता जेवणाला सुरूवात झाली होती.
अशात दिवसभर काम करून थकल्यावर फोटोग्राफर जेव्हा जेवायला बसला तेव्हा त्याला तू जेवणाच्या ताटावरून उठवण्यात आलं. त्याला सांगण्यात आलं की, तुला आणखी फोटो काढायचे आहेत. त्यानंतर फोटोग्राफर आपल्या मित्राजवळ गेला आणि त्याला म्हणाला की, मला जेवण करण्यासाठी २० मिनिटांचा ब्रेक हवा. पण नवरदेवाने यास नकार दिला. फोटोग्राफरनुसार, नवरदेवाने हे सांगितलं की, एकतर त्याने फोटो काढावे नाही तर पैसे न घेताच घरी जावे.
नवरदेवाच्या या बोलण्यावर फोटोग्राफर भडकला. त्याने नवरदेवासमोरच लग्नात काढलेले सगळे फोटो डिलीट केले. आणि हे सांगत तेथून गेला की, आता मी तुझा फोटोग्राफर नाहीये. फोटोग्राफरने सांगितलं की, तो फार थकलेला होता. लग्नाच्या ठिकाणी एसी नव्हता. गरमीमुळे माझी अवस्था वाईट झाली होती.