१०० वर्षांत तिसऱ्यांदा कॅमेऱ्यात कैद झाला 'ब्लू व्हेल', ८२ फूट लांब अन् एक लाख किलो वजन असल्याचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 02:20 PM2020-09-06T14:20:12+5:302020-09-06T14:28:01+5:30

सियान यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ब्लू व्हेलचा फोटो शेअर केला आहे.

photographer sean captures blue whale possibly only third time in 100 years | १०० वर्षांत तिसऱ्यांदा कॅमेऱ्यात कैद झाला 'ब्लू व्हेल', ८२ फूट लांब अन् एक लाख किलो वजन असल्याचा दावा 

१०० वर्षांत तिसऱ्यांदा कॅमेऱ्यात कैद झाला 'ब्लू व्हेल', ८२ फूट लांब अन् एक लाख किलो वजन असल्याचा दावा 

googlenewsNext
ठळक मुद्देकॅमेर्‍यावर ब्लू व्हेल माशाचा फोटो कैद होणे, ही काही नवीन घटना नाही.मात्र, गेल्या १०० वर्षात असे तिसऱ्यांदा झाले आहे, ज्यावेळी सिडनीच्या किनाऱ्याजवळ ब्लू व्हेल मासा इतक्या जवळ दिसल्याचे म्हटले जाते.

सिडनी : जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी ब्लू व्हेल मासा समुद्रात राहतो. ब्लू व्हेल जातीचे मासे अत्यंत दुर्मीळ आहेत. ते लोकांना क्वचितच दिसतात. जगभरातील शास्त्रज्ञ आणि संशोधक ब्लू व्हेलवर रिसर्च करत आहेत. यासाठी, संशोधकांकडून खोल समुद्रात जाऊन ब्लू व्हेलचा शोध घेतला जातो. मात्र, काही लोकांचे नशिब चांगले आहे की, त्यांना ब्लू व्हेलपाशी घेऊन जाते.

अशीच एक अजब घटना ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात घडली आहे. येथील एक छायाचित्रकार हंपबॅक व्हेलचे फोटो काढत होते. त्याचवेळी त्यांच्या कॅमेऱ्यात ब्लू व्हेल माशाचा फोटो कैद झाला. या ब्लू व्हेलची लांबी ८२ फूट आणि वजन सुमारे १ लाख किलो असल्याचे सांगितले जाते.

कॅमेर्‍यावर ब्लू व्हेल माशाचा फोटो कैद होणे, ही काही नवीन घटना नाही. मात्र, गेल्या १०० वर्षात असे तिसऱ्यांदा झाले आहे, ज्यावेळी सिडनीच्या किनाऱ्याजवळ ब्लू व्हेल मासा इतक्या जवळ दिसल्याचे म्हटले जाते. सिडनीमध्ये ब्लू व्हेल दिसल्यानंतर प्रत्येकाला आश्चर्य आनंद वाटला. ब्लू व्हेलचा हा फोटो सिडनी येथील छायाचित्रकार सियान यांनी टिपला आहे.

सियान यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ब्लू व्हेलचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्यांनी लिहिले आहे की, "मी कोठून सुरुवात करू? मी निशब्द झालो आहे. माझ्या डोक्यात लाखो गोष्टीं फिरत आहेत. जर या व्हेलबाबत बोललो तर तो ३० मीटर पर्यंत असू शकते. त्याच्या जिभेचे वजन हत्तीच्या बरोबरीचे असू शकते. त्याचे हृदयही कारसारखे मोठे असू शकते. आपण माझ्यासारखाच त्याचा आनंद घेत असाल, अशी आशा आहे." 

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या एनएसडब्ल्यू नॅशनल पार्क्स अँड वाइल्डलाइफ सर्व्हिसने या फोटोवर पूर्ण प्रेस रिलीज केली आहे.

आणखी बातम्या...

राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करा अन् शरद पवारांना अध्यक्ष बनवा; रामदास आठवलेंची सूचना    

- 'ना भूले हैं, ना भूलने देंगे'; सुशांतच्या मृत्यूवरून राजकारण, भाजपाने छापले स्टिकर्स    

- "२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला     

- "स्वत:चे ट्विटर हँडल स्वत: वापरावे, राजकीय पक्षांना देऊ नये", संजय राऊतांचा कंगना राणौतला टोला      

- BSNL कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार, खर्चात काटकसर करण्याचे आदेश

- एकतर ती संस्कारानेच कृतघ्न किंवा मानसिक संतुलन ढासळलेले; धनंजय मुंडेंची कंगनाला चपराक    

-'...अन्यथा कंगनाच्या सिनेमाचे सेट जाळून टाकू', करणी सेनेचा इशारा

- कंगनाने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही; भाजपाचा 'यू-टर्न'

मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान

Web Title: photographer sean captures blue whale possibly only third time in 100 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.