राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा असणारी फिजिओथेरपिस्ट बनली पॉर्नस्टार, कारण वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 12:30 PM2022-06-23T12:30:21+5:302022-06-23T12:31:05+5:30
Cherie DeVille : डेली स्टारमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, चेरी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभी राहिली होती. तिने तिच्या फॅन्सची मतं मिळवण्यासाठी एक वेबसाइटही लॉन्च केली होती.
(Image Credit : lifetailored.com)
Physiotherapist turns Porn Star wants to be President: बऱ्याच वर्षांपासून पॉर्न इंडस्ट्रीत काम करणारी स्टार चेरी डेविलने (Cherie DeVille) तिच्या आयुष्यासंबधी काही रहस्य जगासमोर आणले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने सुरूवातीच्या दिवसांना उजाळा देत सांगितलं की, तिने या इंडस्ट्रीत काम करण्यासाठी 9 ते 5 ची नोकरी सोडली होती, जेणेकरून तिला तिचं आयुष्य मनाप्रमाणे हवं तसं जगता यावं.
चेरी डेविल आज अॅडल्ट इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. सोशल मीडियावर तिचे कोट्यावधी फॅन्स आहेत. पॉर्न इंडस्ट्रीत आज तिचं मोठं नाव आहे. यूएस पॉर्न इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक चेरी आपलं मानधन स्वत: ठरवते. सध्या चर्चा का होत आहे, हे जाणून घेऊ.
बनायचं होतं अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष
डेली स्टारमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, चेरी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभी राहिली होती. तिने तिच्या फॅन्सची मतं मिळवण्यासाठी एक वेबसाइटही लॉन्च केली होती. आपल्या प्रेसिडेंशिअल बिडसाठी तिने एक प्रसिद्ध रॅपर आणि आपल्या मित्रांसोबत मोठं कॅम्पेन केलं चालवलं होतं. पण नंतर चेरीने त्या स्वप्नासोबत तडजोड केली आणि मग नंतर ती पॉर्न इंडस्ट्रीत हिट झाली.
प्रोफेशनल फिजिओथेरपिस्ट चेरी
राजकारण आणि पॉर्न इंडस्ट्रीत नाव कमावण्याआधी चेरी लोकांच्या शारीरिक वेदना कमी करण्याचं काम करत होती. कारण ती मेडिकल सेक्टरमध्ये काम करत होती. चेरी एक प्रोफेशनल फिजिओथेरपिस्ट होती. स्टिफ सॉक्स पॉडकास्ट मुलाखतीत चेरीने सांगितलं की, कशाप्रकारे मेडिकल सेक्टरमधील चांगलं करिअर सोडून तिने पॉर्नच्या विश्वात पाउल ठेवलं. ती म्हणाली की, मी विचारही केला नव्हता की, मी पॉर्न इंडस्ट्रीत काम करणार. कारण मी एक फिजिओथेरपिस्ट होते आणि ते प्रोफेशन सोडून मला आता 20 वर्षे झाली आहेत.
स्वत:चे पॉर्न बघत नाही
चेरीने सांगितलं की, कशाप्रकारे तिची भिती दूर झाली. कारण सेटवर लोक तिला पूर्णपणे सहकार्य करतात. ती म्हणाली की, मला या कामात फार मजा येऊ लागली. आधी मला भिती होती की, हे तेवढं प्रोफेशनल नसेल, पण मला विश्वास होता की, मला मजा येईल. शूटिंग सुरू होण्यापासून ते संपेपर्यंत मी पूर्ण प्रोसेसला खुलेपणाने जगते. पॉर्न इंडस्ट्रीत काम करत असूनही चेरी सांगते की, ती तिचे स्वत:चे पॉर्न कधीच बघत नाही.
कशी मिळाली ऑफर?
मुलाखतीत चेरीने सांगितलं की, फिजिओथेरपिस्टचं काम करून खर्चापुरते पैसे निघत होते. पण मला आणखी जास्त पैसे हवे होते. माझ्या सध्याच्या एजंटने मला शोधलं आणि म्हणाला की, 'तुम्ही पॉर्न सिनेमात काम करणार का? मी म्हणाले काय? नंतर चेरीने सांगितलं की, लवकरच तिला समजलं की, ही एक कायदेशीर इंडस्ट्री आहे जिथे भरपूर मजा आणि भरपूर पैसा कमावला जाऊ शकतो. त्यामुळे ती पॉर्न इंडस्ट्रीत आली.