जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणी तुम्हाला माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 02:56 PM2018-10-05T14:56:30+5:302018-10-05T14:58:29+5:30
असं म्हटलं जातं की, सोन्याची चमक कधीही कमी होत नाही. तसंच सरकारी तिजोरीमध्ये सोनं असणं हे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचं मानलं जातं.
असं म्हटलं जातं की, सोन्याची चमक कधीही कमी होत नाही. तसंच सरकारी तिजोरीमध्ये सोनं असणं हे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचं मानलं जातं. जगभरामध्ये दक्षिण आफ्रिकेतील सोन्याच्या खाणी सर्वात जुन्या आणि सर्वात खोल मानल्या जातात. परंतु जगभरात अनेक खाणी आहेत, जाणून घेऊयात जगभरातील सर्वात मोठ्या खाणींबाबत...
मुरुन्तौ (उज्बेकिस्तान)
जगभरामध्ये सोन्याचं सर्वात जास्त उत्पादन उज्बेकिस्तानमध्ये असलेल्या मुरुन्तौच्या खाणीमधून होतं. या खाणीमधून 2017मध्ये एकूण 26 लाख औंस सोनं काढलं जातं. ही एक ओपन पिट खाण आहे. या खाणीची लांबी 3.35 किमी, रूंदी 2.5 किमी आणि खोली 560 मीटर आहे. ही खाण पूर्णपणे स्थानिक सरकारच्या ताब्यात आहे. एक औंस सोन्याचा अर्थ 31.10 ग्रॅम आहे. असं म्हटलं जातं की, मुरुन्तौच्या खाणीमधून आणखी 1700 लाख औंस सोनं काढलं जाऊ शकतं.
प्यूब्लो विएजो
ही खाण दोन कंपन्यांच्या ताब्यात आहे. बैर्रिक आणि गोल्ड कॉर्प एकत्रितपणे येथे खोदकाम करतात. यामध्ये बैर्रिकची भागीदारी 60 टक्के आहे आणि गोल्ड कॉर्पची भागीदारी 40 टक्के आहे. डोमिनिकन रिपब्लिकमध्ये 2012 दरम्यान ही खाण खोदण्यात आली होती. 2016मध्ये या खाणीतून 11.08 लाख औंस सोनं काढण्यात आलं.
ग्रासबर्ग (इंडोनेशिया)
ही एक ओपन पीट खाण आहे. सोन्याच्या उत्पादनाच्या आधारावर ही जगभरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मागच्या वर्षी या खाणीमधून 11.31 लाख औंस सोनं काढण्यात आलं ग्रासबर्गच्या अथॉरिटीने 2017पर्यंत खोदण्यास परवानगी दिली होती.
यानकोचा (दक्षिण अमेरिका)
ही खाण डिपार्टमेंट आणि काजमार्का या दन संस्थांच्या ताब्यात आहे. उत्तरपूर्व लीमापासून ही खाण 800 किलोमीटर दूर आहे. समुद्र सपाटीपासून याची उंची 3500-4100 मीटर आहे. 2014मध्ये या खाणीमधून 9.70 लाख औंस सोनं काढण्यात आलं होतं.
कार्लिन ट्रेंड (नेवाडा)
न्यूमोंट कार्लिन ट्रेन्ड माइन कॉम्प्लेक्स अमेरिकेच्या नेवाडामध्ये आहे. ही खाण अंडरग्राउंड असल्याने ओपन पीट आहे. उत्पादनानुसार ही जगातील पाचवी सर्वात मोठी खाण आहे. 2017मध्ये या खाणीमधून 13 टक्के उत्पादन कमी होऊन 9.07 लाख औंस उत्पादन घेण्यात आलं. तेच 2013मध्ये 10.25 लाख औंस सोन्याचं उत्पादन घेण्यात आलं.