रस्त्याचं काम सुरू असताना जेसीबी चालकाला सापडला खजिना, अख्खा गाव जमला; अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 04:28 PM2021-08-26T16:28:34+5:302021-08-26T16:30:31+5:30

रस्त्याचं चौपदरीकरण सुरू असताना नाण्यांनी भरलेला हंडा सापडला

pitcher filled with coins found in the excavation in utttar pradesh by jcb driver | रस्त्याचं काम सुरू असताना जेसीबी चालकाला सापडला खजिना, अख्खा गाव जमला; अन् मग...

रस्त्याचं काम सुरू असताना जेसीबी चालकाला सापडला खजिना, अख्खा गाव जमला; अन् मग...

Next

कनोज: उत्तर प्रदेशातल्या कनोजमधील छिबरामऊ जवळ असलेल्या जी टी रोडच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. याच परिसरात रायपूरजवळ खोदकाम सुरू असताना नाण्यांनी भरलेला एक हंडा सापडला. नाण्यांनी भरलेला हंडा घेऊन जेसीबी चालक फरार झाला. चार दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस त्याच्या नातेवाईकांकडून त्याची माहिती गोळा करत आहेत. 

कनोज जिल्ह्याच्या छिबरामऊमध्ये रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. याच भागात असलेल्या रायपूरमध्ये खोदकामावेळी नाण्यांनी भरलेला हंडा सापडला. जेसीबी चालकानं हंडा घेऊन पळ काढला. या घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थ घटनास्थळी आले. मात्र तोपर्यंत जेसीबी चालक फरार झाला होता. ग्रामस्थांच्या हाती काही नाणी लागली असून त्याबद्दल संशोधन सुरू आहे.

नाण्यांनी भरलेल्या हंड्याची बातमी गावात वणव्यासारखी पसरली. सगळ्यांनी खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी धाव घेतली. हंड्यात ऍल्युमिनियमची नाणी असावीत असा अंदाज ग्रामस्थांनी वर्तवला. काही ग्रामस्थांनी याची माहिती पुरातत्व विभागाला दिली आहे. पोलीस फरार जेसीबी चालकाचा शोध घेत आहेत. तर ग्रामस्थ परिसरात खोदकाम करून नाण्यांसाठी शोधाशोध करत आहेत.

Web Title: pitcher filled with coins found in the excavation in utttar pradesh by jcb driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.