Pizza Volcano :आश्चर्य! धगधगत्या ज्वालामुखीवर बनवला पिझ्झा; चीज अन् टोमॅटो सॉस घालून काही सेकंदात तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 06:56 PM2021-05-14T18:56:17+5:302021-05-14T19:11:59+5:30
Pizza Volcano : असा तसा नाही तर थेट ज्वालामुखीवर या माणसानं पिझ्झा (Pizza on volcano) बनवला आहे.
जगभरात असे खूप कमी लोक सापडतील ज्यांना पिझ्झा खायला आवडत नाही. भारतातही मोठ्या प्रमाणावर लोकांना पिझ्झा खायला आवडतो. कोरोनाच्या मााहामारीमुळे इतर सर्व दुकांनाप्रमाणेच पिझ्झा आऊटलेट्सही बंद होते. त्यामुळे लोकांनी घरच्याघरी पिझ्झा बनवायला सुरूवात केली. पिझ्झा खाण्याचं वेड असलेल्या एका व्यक्तीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. असा तसा नाही तर थेट ज्वालामुखीवर या माणसानं पिझ्झा (Pizza on volcano) बनवला आहे.
सोशल मीडियावर पिझ्झा बनवण्याची ही पद्धत चांगलीच व्हायरल होत आहे. डेविड गार्सिया नावाच्या एका व्यक्तीनं (volcano) एका धगधगत्या ज्वालामुखीवर पिझ्झा बनवला आहे. डेविडनं आपला जीव धोक्यात घालून हा पिझ्झा बनवला आहे. एएफपीच्या अहवालानुसार, डेव्हिडने एका सक्रिय ज्वालामुखीवर पिझ्झा बनविला.
VIDEO: 🇬🇹🌋🍕 In an improvised kitchen among volcanic rocks, David Garcia stretches his dough and selects ingredients for a #pizza destined for a rather unusual oven: a river of lava that flows from the Pacaya #volcano in Guatemala pic.twitter.com/wVmnnl61Ib
— AFP News Agency (@AFP) May 12, 2021
डेविडनं पिझ्झा तयार करण्यासाठी खास धातूपासून तयार झालेल्या पत्र्याचा वापर केला. हा पत्रा १८०० फॅरेनहाइट तापमानातही काम करण्यास सक्षम आहे. गार्सियाने सांगितले की, इतक्या तापमानात १४ मिनिटात पिझ्झा तयार होतो. डेलीमेलनं दिलेल्या वृत्तानुसार मोठ्या संख्येने पर्यटक गार्सियाजवळ जात असून थेट लाव्हाच्या उष्णतेवर पिझ्झा तयार होताना पाहत आहेत. कमालच झाली राव! कोंबडा बोलू लागला अल्लाह अल्लाह; तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ
या ज्वालामुखीमधून फेब्रुवारी महिन्यापासून लाव्हा बाहेर येतात. त्यामुळे स्थानिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. हा ज्वालामुखी जवळपास २३ हजार वर्षांपूवी फुटला होता. डेव्हिडने पिझ्झा बनवण्यासाठी आपल्या हातात संरक्षणात्मक ग्लोव्हज घातले होते. जेणेकरून त्याचे हात लावाने जळू नये. थोड्या वेळात लावाच्या आचेवर पिझ्झा तयार झाला. मिळालेल्या माहितीनुसार ग्वाटेमालाचा हा सक्रिय ज्वालामुखी आतापर्यंत दोन डझनहून अधिक वेळा फुटला आहे. मुलाच्या तोंडातलं छिद्र पाहून घाबरली आई; डॉक्टरांनी लक्षात आणून दिली मोठी चूक