असा देश जिथे कबरेत मृतदेह ठेवण्यासाठी द्यावं लागतं भाडं, भाडं नाही दिलं तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 01:21 PM2023-10-31T13:21:38+5:302023-10-31T13:25:02+5:30
हा सुंदर देश एकेकाळी गृहयुद्धाच्या आगीत पेटला होता. मात्र, तरिही येथील लोक सतत हसतमुख आणि आनंदी असतात.
जगातल्या अनेक देशांमधील विचित्र नियम नेहमीच चर्चेत असतात. कुठे सार्वजनिक ठिकाणी कपलला फिरता येत नाही तर कुठे लहान कपडे घालता येत नाही. पण आज आम्ही तुम्हाला एका देशातील त्याहून अजब नियमाबाबत सांगणार आहोत. या देशाचं नाव आहे ग्वातेमाला. हा सुंदर देश एकेकाळी गृहयुद्धाच्या आगीत पेटला होता. मात्र, तरिही येथील लोक सतत हसतमुख आणि आनंदी असतात.
वेगवेगळ्या रिपोर्टनुसार, जगात सर्वात जास्त हत्त्या ग्वातेमाला येथे होतात. तरी सुद्धा हॅपीनेस इंडेक्सबाबतीत 1.66 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला हा देश 100 देशांच्या यादीत असल्याचे सांगितले जाते.
या देशात सार्वजनिक बसला लोक 'चिकन बस' असं म्हणतात. कारण या बसमध्ये त्यांच्यासोबतच मोठ्या प्रमाणात बकऱ्या आणि कोंबड्याही वाहून नेल्या जातात.
ग्वातेमालातील सर्वात विचित्र नियम म्हणजे इथे मृतांना कबरेत ठेवण्यासाठी दर महिन्याला भाडं द्यावं लागतं. ज्या परिवारातील व्यक्तीची कबर असते, ते व्यक्ती जर एखाद्या महिन्यात भाडं देऊ शकले नाहीत तर मृतदेह कबरेतून काढून बाहेर ठेवला जातो आणि त्याजागी दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह ठेवला जातो.
असं असलं तरी येथील सरकारने वेगवेगळ्या शहरांच्या बाहेर एक स्मशानभूमी तयार केली आहे. इथे त्या मृतदेहांना दफन केलं जातं, ज्यांचे परिवार दर महिन्याला कबरेचं भाडं देऊ शकत नाहीत.