थरार! लँड होता होता विमानाने केलं टेक अॉफ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 06:55 PM2017-10-31T18:55:49+5:302017-10-31T19:10:50+5:30
एक विमान धावपट्टीवर लँड होता होता पुन्हा अचानक उडू लागलं. त्यामुळे नक्की काय होतंय हे आतल्या प्रवाशांना कळलंच नाही.
ऑस्ट्रीया : काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना नुकतीच सल्झर्बग या विमानतळावर घडली. एक विमान धावपट्टीवर लँड होता होता पुन्हा अचानक उडू लागलं. धावपट्टीवरच्या हवेच्या तीव्र झोतामुळे पायलटला पुन्हा हे विमान उडवावं लागलं. त्यामुळे नक्की काय होतंय हे आतल्या प्रवशांना कळलंच नाही. म्हणून विमानात एकच कल्लोळ उठला होता.
ऑस्ट्रीयामधील सल्झर्बग या विमानतळावर सोमवारी सकाळी दि पॉलिश एन्टर एअर फ्लाईट लँड होत असताना ही घटना घडली. विमान खाली उतरत असताना अचानक वादळ निर्माण झालं. त्यामुळे विमानातील पायलटलाही नेमकं काय करावं हे कळलं नाही. पायलटने पुन्हा हे विमान जर्मनीच्या फ्रँकफ्रिडकडे वळवले. हा सगळा थरार एका व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. विमान धावपट्टीवर उतरण्याआधीच पुन्हा विमाने टेक ऑफ घेतल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय. व्हिडीयो पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तर याचप्रमाणे याच विमानाचा दुसरा व्हिडिओही समोर आला आहे. या दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रवाशांनी आतील बाजूने विमानाचे पंख हवेच्या झोताने कशाप्रकारे उडत होते हे दाखवलं आहे. या परिसरात हवेचा दाब जास्त असल्याने विमानाच्या पंखांवरही त्याचा परिणाम जाणवत होता. पायलटच्या हुशारीमुळे मोठा अपघात होण्याचे टाळले असंही म्हटलं जात आहे. त्याने काळी वेळ विमान तसेच आकाशात फिरते ठेवलं. वातावरण शांत झाल्यावर विमान शिताफीने खाली उतरवलं. शेवट सुखाचा झाल्यानंतर विमानतळावरील कर्मचारी, प्रवासी आणि इतरांनी सुटकेचा श्वास सोडला.
सौजन्य - www.thesun.co.uk