‘प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया’, प्लास्टिकच्या कचऱ्यापासून रस्त्याच्या निर्मितीचे तंत्र शोधणारा अवलिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 03:50 PM2020-02-12T15:50:25+5:302020-02-12T16:02:11+5:30
शास्त्रज्ञांच्यामते एकदा प्लास्टिक तयार झाल्यानंतर पुर्णपणे नष्ट होण्यासाठी हजार वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो.
शास्त्रज्ञांच्यामते एकदा प्लास्टिक तयार झाल्यानंतर पूर्णपणे नष्ट होण्यासाठी हजार वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो. हेच प्लास्टिक आज माणसाच्या जीवनात सगळयात जास्त समस्या निर्माण करणारं ठरलं आहे. संपूर्ण जग हे प्लास्टिकच्या वापरापासून सुटका मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर एकिकडे भारतातील काही टक्के लोक प्लास्टिकचा कचरा होऊ नये म्हणून उपाय शोधत आहेत. याचा फायदा देशाला सुद्धा होणार आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका भारतीयाबद्दल सांगणार आहोत. जो भारताचा प्लास्टीक मॅन ठरला आहे.
या प्लास्टिक मॅनचे संपूर्ण नाव राजगोपालन वासूदेवन आहे. या माणसाने असा शोध लावला आहे. ज्याचा वापर करून प्लास्टीकच्या सहय्याने सुंदर आणि टिकाऊ रस्ते तयार करता येऊ शकतात. वासुदेवन मदुरै यूनिवर्सिटीतील Thiagarajar College Of Engineering मधिल रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. प्लास्टिकचा कचरा आणि त्यामुळे निर्माण होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी त्यांनी अनेक टेक्निक्स वापरल्या.
त्यांच्या या शोधाचे श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री जयललीता यांना जातं. कारण त्यांनी पेटंट उपलब्ध करून दिले. ज्यामुळे अनेक भागात प्लास्टिकचा वापर करून चांगले रस्ते करण्यात येतील. राष्ट्रीय राजमार्ग प्रधिकरण सुद्धा या तंत्राचा वापर करत आहेत. या पध्दतीमुळे प्लास्टिकपासून तयार होत असलेला कचरा आणि रस्ते या दोन्ही समस्यांवर उपाय निघणार आहे. या टेक्निकचा वापर करून आत्तापर्यंत भारतात १ लाख किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले आहेत. अजूनही अनेक प्रोजेक्ट्सवर काम केलं जात आहे.
२०१८ मध्ये भारत सरकारने वासुदेवन यांना या टेक्निकच्या शोधाबद्दल पद्मश्री पुरस्कार देऊन स्नमानित केले होते. वासुदेवन यांचा हा प्रकल्प विकत घेण्यासाठी जगभरातील अनेक लोकांनी प्रयत्न केले. पण त्यांनी भारत सरकारकडे हा शोध सुपूर्त केला. सरकारकडून या तंत्राचा वापर करून अनेक चांगले रस्ते तयार करण्यासाठी योजना आखल्या जात आहेत.