पर्यावरणासाठी बॉटल सोडून या 'थेंबाने' तहान भागवत आहेत लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 02:38 PM2019-04-30T14:38:24+5:302019-04-30T14:43:41+5:30

प्लास्टिकची जेव्हा निर्मिती झाली होती तेव्हा चमत्कार मानला गेला होता. पण आता हा चमत्कार पर्यावरणासाठी अभिषाप ठरत आहे.

Plastic pollution solutions seaweed water pouches London marathon Ooh | पर्यावरणासाठी बॉटल सोडून या 'थेंबाने' तहान भागवत आहेत लोक!

पर्यावरणासाठी बॉटल सोडून या 'थेंबाने' तहान भागवत आहेत लोक!

googlenewsNext

प्लास्टिकची जेव्हा निर्मिती झाली होती तेव्हा चमत्कार मानला गेला होता. पण आता हा चमत्कार पर्यावरणासाठी अभिषाप ठरत आहे. प्लास्टिकमुळे पृथ्वी संकटात सापडते आहे. त्यामुळेच वैज्ञानिक आणि लोक प्लास्टिकच्या पर्यायाचा शोध घेत आहेत. अशातच एक असं प्रॉडक्ट समोर आलं आहे, ज्याने प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटलचा वापर बंद होऊ शकतो. 

एका रिपोर्टनुसार, प्लास्टिक पूर्णपणे नष्ट होण्यासाठी ४५० ते १००० हजार वर्षांचा वेळ लागू शकतो. जगभरातील लोक प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याने सगळीकडे प्लास्टिक बघायला मिळतं. प्लास्टिकमुळे समुद्री जीवही मरण पावत आहेत. 

गेल्या काही वर्षांपासून लोकांचा पब्लिक इव्हेंट्समध्ये सहभाग वाढला आहे. पण हे इव्हेंट्स संपल्यावरचा नजारा फारच वाइट असतो. रिपोर्टनुसार, २०१८ मध्ये लंडन मॅरेथॉनमध्ये ९२०,००० प्लास्टिकच्या बॉटलचा वापर केला गेला. या बॉटल नष्ट व्हायला हजारो वर्ष लागतील. त्यानंतर स्टार्टअप Skipping Rock Lab ने एक कमालीचा आविष्कार केला.

या प्रॉडक्टचं नाव आहे Ooho, जे खाता येणारं पाणी आहे. म्हणजे पाण्याने भरलेला एक छोटा बॉल. तुम्ही हे खाऊन तुमची तहान भागवू शकता. या प्रॉडक्टमुळे मॅरेथॉनसारख्या पब्लिक इव्हेंट्समध्ये प्लास्टिकच्या बॉटल्सचा वापर कमी होऊ शकतो. हा खाता येणारा वॉटर पाउच Seawood (एक समुद्री झाड) पासून तयार करण्यात आला आहे. एकतर तुम्ही हा पाउच खाऊही शकता नाही तर फेकूही शकता. काही दिवसांनी या पाउचचं कव्हर आपोआप नष्ट होतं. 

यावेळी लंडन मॅरोथॉनमध्ये याचा वापर करण्यात आला. आणि यामुळे प्लास्टिकच्या बॉटल्सचा वापर ९२०,००० ऐवजी केवळ ७०४,००० बॉटल्सचा वापर झाला. या पाउचमुळे मॅरेथॉनमध्ये धावणे सुद्धा सोपे होते. महत्त्वाची बाब म्हणजे या पाउचचा वापर केवळ पाण्यासाठीच नाही तर सॉस किंवा ड्रिंक्ससाठीही केला जाऊ शकतो. 

हे प्रॉडक्ट लंडन स्टार्टअपने २०१३ मध्ये तयार केलं आहे. रिपोर्टनुसार, जगभरातील ४० देशांमध्ये प्लास्टिकला पूर्णपणे बॅन करण्यात आलं आहे. पण याबाबतीत भारताची भूमिका जरा लवचिक आहे. म्हणजे काही राज्यांमध्ये प्लास्टिक बंदी आहे तर काहींमध्ये नाही. 

Web Title: Plastic pollution solutions seaweed water pouches London marathon Ooh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.