हर कुत्ते के दिन आते है! तब्बल १५ कोटींचा मालक बनणार कुत्रा, सोबत आलिशान बंगला आणि घरही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 02:10 PM2021-10-08T14:10:27+5:302021-10-08T14:12:20+5:30
हिंदीमधील म्हण 'हर कुत्ते के दिन आते है' तुम्ही ऐकलीच असेल. सध्या एका कुत्र्याबाबत ही म्हण खरी ठरतेय. त्याचे इतके चांगले दिवस आले आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही करु शकत नाही. हा कुत्रा १५ कोटीच्या संपत्तीचा मालक होणार आहे.
हिंदीमधील म्हण 'हर कुत्ते के दिन आते है' तुम्ही ऐकलीच असेल. सध्या एका कुत्र्याबाबत ही म्हण खरी ठरतेय. त्याचे इतके चांगले दिवस आले आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही करु शकत नाही. हा कुत्रा १५ कोटीच्या संपत्तीचा मालक होणार आहे.
प्लेबॉय मासिकाच्या टॉप मॉडेल्सपैकी असलेली एक जू इसेन (Ju Isen) हिने तिचा वारसदार म्हणून तिची संपूर्ण संपत्ती तिच्या पाळीव कुत्र्याच्या म्हणजेच फ्रान्सिस्को याच्या नावावर करण्याची घोषणा केली आहे. जू इसेन ब्राझीलची आहे. ती अमेरिकेत राहते. मृत्युपत्रात तिने तिचे आलिशान घर आणि दोन गाड्या फ्रान्सिस्कोच्या नावावर केल्या आहेत. ‘माझ्या मृत्यूनंतर माझ्या १५ कोटींच्या संपत्तीचा मालक माझा पाळलेला कुत्रा असेल. मला मूल होण्याची शक्यता नसल्याने मी हा निर्णय घेतला. या पैशांमुळे फ्रान्सिस्को आरामात जगू शकेल’ असे तिने म्हटलं आहे.
जू इसेनचे वय ३५ वर्षे आहे. ती फ्रान्सिस्कोवर मुलासारखे प्रेम करते. इन्स्टाग्रामवरच्या (Instagram) तिच्या बहुसंख्य पोस्टमध्ये फ्रान्सिस्को तिच्यासोबत असतोच! ती फ्रान्सिस्कोला तिच्या खासगी जेटमधून (Private Jet) फिरायला नेते आणि त्याला स्टायलिश कपडे घालते! फ्रान्सिस्कोची जीवनशैली एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे आहे.
सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी (Plastic Surgery) करणे, हा तिचा छंद आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तिने किमान ५० पेक्षा जास्त प्लास्टिक सर्जरी करून घेतल्या आहेत. आता अशी स्थिती आहे, की ती आरशात स्वतःला ओळखू शकत नाही!