VIDEO! नवरा उठसूठ शारीरिक संबंध ठेवतोय; वैतागलेल्या महिलेची लॉकडाऊन संपवण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 09:02 AM2020-04-15T09:02:53+5:302020-04-15T09:34:44+5:30
एका महिलेने व्हिडीओच्या माध्यमातून तक्रार केली आहे की, घरात राहून पतीला काहीच काम नाही, त्यामुळे तो सतत शारीरिक संबंधाची मागणी करतो.
(प्रातिनिधीक छायाचित्र)
कोरोनाला रोखण्यासाठी जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलंय. त्यामुळे जगातील अर्धे लोक घरातच आहेत. आता इतके दिवस घरात राहत असल्याने घरात काहीना काही समस्या वाढत आहेत. कौटुंबिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
काही महिलांना विचित्र समस्यांचा सामना करावा लागत आहे. एका महिलेने व्हिडीओच्या माध्यमातून तक्रार केली आहे की, घरात राहून पतीला काहीच काम नाही, त्यामुळे तो सतत शारीरिक संबंधाची मागणी करतो. पुन्हा पुन्हा शारीरिक संबंधाच्या मागणीला वैतागलेल्या एक महिलेने तिचं दु:खं व्यक्त केलं आहे.
या महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून ही या महिनेने व्हिडीओच्या माध्यमातून लॉकडाऊन संपवण्याची मागणी सरकारकडे केली आहे. ही महिला आफ्रिकन देश घानामधील आहे.
'लॉकडाऊन संपवा पतीला कामावर पाठवा'
महिलेची मागणी आहे की, जर लॉकडाऊन संपवला जाऊ शकत नसेल तर त्यांच्या पतींना कामावर जाण्याची परवानगी द्यावी. घानामध्ये आतापर्यंत 500 पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे. तर 8 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी आफ्रिकी देशांमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
आपलं दु:खं व्यक्त करणाऱ्या या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. यात महिला सांगत आहे की, ती लॉकडाऊनमुळे पतीच्या सततच्या शारीरिक संबंधाच्या मागणीला वैतागली आहे. या महिलेने असाही दावा केला आहे की, या देशात या समस्येने हैराण झालेल्या अनेक महिला आहेत.
'लॉकडाऊन शारीरिक संबंधासाठी नाही'
महिला बोलत आहे की, 'झोपेतून उठत नाही तर पती शारीरिक संबंधासाठी तयार बसलेला असतो. त्याचं झालं की, त्याच्यासाठी जेवण तयार करा, तो जेवणार नंतर पुन्हा तो शारीरिक संबंधाची मागणी करणार..पुन्हा शारीरिक संबंध...लॉकडाऊन काय शारीरिक संबंधासाठी केलाय का? आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लॉकडाऊन आहे ना? माझा पती फार जास्त त्रास देतो आहे'.
या महिलेने अनेक महिलांच्या समस्येला वाचा फोडली आहे. पण सरकार यावर काही करणार की तिच्या मागणीकडे दुर्लक्ष करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.