‘पोकेमॉन गो’ची क्रेझ उतरली
By Admin | Published: August 24, 2016 06:02 PM2016-08-24T18:02:17+5:302016-08-24T18:27:52+5:30
सध्याच्या इंटरनेटच्या जगात एखादी गोष्ट एवढी लोकप्रिय झाली की, त्याकडे पाहणे अशक्य होणार नाही असे होणारच नाही. गेल्या काही दिवसांपासून ‘पोकेमॉन गो’ हा मोबाईल गेम इतका
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - सध्याच्या इंटरनेटच्या जगात एखादी गोष्ट एवढी लोकप्रिय झाली की, त्याकडे पाहणे अशक्य होणार नाही असे होणारच नाही. गेल्या काही दिवसांपासून ‘पोकेमॉन गो’ हा मोबाईल गेम इतका प्रचंड लोकप्रिय झाला की, सर्वांना त्याने वेड लावले. मात्र आता त्याची क्रेझ कमी होताना दिसते आहे.
ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये ‘पोकेमॉन गो’ च्या युजर्सची दिवसांगणिक संख्या ४५ मिलियन इतकी होती. त्यानंतर महिन्याभरात ही संख्या ढासळत गेली. तिच आता ऑगस्टमध्ये ३० मिलियन इतकी झाली आहे.
मोबाईलवरील ‘पोकेमॉन गो’ गेमिंग अॅप निवडक देशांमध्ये लाँच करण्यात आले आहे. सुरुवातीला अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्ये लॉंच करण्यात आले होते. त्यांनतर जगभरातील २६ देशांमध्ये लॉंच करण्यात आले. मात्र अद्याप भारतात अधिकृत लॉंच करण्यात आलेले नाही.