एका ऑटोतून बाहेर पडले एवढे सारे लोक, पोलीस अधिकारी मोजतच राहिले; बघाल तर तुम्हीही व्हाल अवाक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 03:10 PM2023-01-10T15:10:31+5:302023-01-10T15:11:38+5:30

खरे तर, हा व्हिडिओ पोलीस अधिकारी भागवत प्रसाद पांडे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना, 'अधिक सवारी, दुर्घटना की तैयारी,' असे त्यांनी लिहिले आहे.

Police officers kept counting all the people who got out of an auto breaking traffic rule police officer shared video | एका ऑटोतून बाहेर पडले एवढे सारे लोक, पोलीस अधिकारी मोजतच राहिले; बघाल तर तुम्हीही व्हाल अवाक

एका ऑटोतून बाहेर पडले एवढे सारे लोक, पोलीस अधिकारी मोजतच राहिले; बघाल तर तुम्हीही व्हाल अवाक

Next

गेल्या काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता. यात एक ऑटोमध्ये तब्बल पन्नास प्रवासी बसलेले होते. यानंतर ही ऑटो पोलिसांनी पकडली होती. आताही काहिसा असाच एक व्हडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यातही एवढे प्रवासी बसलेले होते, की पोलीस अधिकारीही थक्क झाले. अखेर पोलिस अधिकाऱ्याने ती ऑटो रोखली.

खरे तर, हा व्हिडिओ पोलीस अधिकारी भागवत प्रसाद पांडे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना, 'अधिक सवारी, दुर्घटना की तैयारी,' असे त्यांनी लिहिले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, भागवत पांडे हे मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात तैनात आहेत. ते सातत्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत असतात आणि लोकही त्यांच्या पोस्टवर कमेंट करत असतात.

प्रवाशांना ऑटोतून खाली उतरवले - 
व्हिडिओमध्ये दिसत आहे, ही संबंधित ऑटो पुढे जात आहे आणि मागच्या बाजूने तिचा व्हिडिओ तयार करण्यात येत आहे. गमतीशीर गोष्ट म्हणजे, ऑटोत बसलेले लोक कॅमेऱ्याकडे बघत आहेत. काही अंतरावर गेल्यानंतर ही ऑटो रोखण्यात आली आणि तिच्यात बसलेल्या सर्व प्रवाशांनाही खाली उतरवण्यात आले. यानंतर जेव्हा प्रवासी मोजण्यात आले तेव्हा या ऑटोत तब्बल 19 प्रवासी बसलेले होते, असे लक्षात आले.

ऑटो ड्रायव्हरवर कारवाई -
एकाच ऑटोमध्ये एवढे लोक पाहून येणारे जाणारे लोकही अवाक झाले. या ऑटो ड्रायव्हरवर कारवाई करण्यात आल्याचे आणि त्याची ऑटो जप्त करण्यात आल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत.

Web Title: Police officers kept counting all the people who got out of an auto breaking traffic rule police officer shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.