रात्री झोपल्यावर पतीच्या खिशातून गायब होत होता गुटखा, पत्नीवर नजर ठेवली आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 04:18 PM2024-10-03T16:18:51+5:302024-10-03T16:19:20+5:30

एका पती-पत्नीचं नातं घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. पती-पत्नीच्या वादाचं कारणही अजब आहे. ते म्हणजे गुटखा.

Police solved dispute of gutkha addicted couple, women ready to leave addiction | रात्री झोपल्यावर पतीच्या खिशातून गायब होत होता गुटखा, पत्नीवर नजर ठेवली आणि मग...

रात्री झोपल्यावर पतीच्या खिशातून गायब होत होता गुटखा, पत्नीवर नजर ठेवली आणि मग...

तंबाखू, गुटख्याचं सेवन करणं आरोग्यासाठी नुकसानकारक असतं हे सगळ्यांनाच माहीत असतं. तरीही अनेक लोक यांचं सेवन करणं बंद करत नाही. तंबाखू-गुटख्यामुळे अनेकांचे परिवारही तुटतात. आग्र्याहून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका पती-पत्नीचं नातं घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. पती-पत्नीच्या वादाचं कारणही अजब आहे. ते म्हणजे गुटखा.

पती-पत्नीमध्ये वाद पेटला तो गुटखा खाण्यावरून. पतीला गुटखा खाताना पाहून महिलेला देखील गुटखा खाण्याची सवय लागली होती. अशात महिला बाहेर जाऊन गुटखा न आणता पतीच्या खिशातील गुटख्याचे पाकिट काढून घेत होती. अशात त्याला काही वेळा संशय आला. त्याला नंतर लक्षात आलं की, त्याच्या लपून पत्नी सुद्धा गुटखा खाते. त्याने पत्नीला असं करण्यास मनाई केली. मात्र, पत्नीने काही ऐकलं नाही. रागाच्या भरात पतीने पत्नीला माहेरी पाठवून दिलं. माहेरी गेल्यावर पत्नी थेट पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पतीकडून घटस्फोटाची मागणी केली. जेव्हा पतीला याबाबत समजलं तेव्हा त्याला धक्का बसला.

news18.com च्या वृत्तानुसार, व्यक्ती एका खाजगी कंपनीमध्ये काम करतो. २०२२ मध्ये दोघांचं लग्न झालं होतं. त्यानंतर त्यांना दोन अपत्यही झालीत. व्यक्तीला आधीच गुटखा खाण्याची सवय आहे. ऑफिसमधून घरी आल्यावर तो काही गुटख्याचे पॅकेट्स आपल्या खिशात ठेवत होता. पण अचानक त्यातील पॅकेट्स कमी झाल्याचं किंवा गायब झाल्याचं लक्षात आलं. अशात त्याने पत्नीवर लक्ष ठेवलं. तेव्हा त्याला समजलं की, त्याच्या पत्नीला सुद्धा गुटखा खाण्याची सवय लागली आहे. 

पतीने जेव्हा पत्नीला गुटखा खाण्यास मनाई केली तर तिने नकार दिला. महिलेचं म्हणणं आहे की, ती थोडाच गुटखा खाते. पतीने महिलेला माहेर पाठवलं आणि त्यानंतर महिलेने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी दोघांना कौटुंबिक समुपदेशन क्रेंदात पाठवलं. इथे दोघांची काउन्सेलिंग करण्यात आली. केंद्राने दोघांनाही गुटखा सोडण्याचा सल्ला दिला. नंतर दोघांनाही गुटखा सोडणार असल्याचं वचन दिलं आणि घरी परत गेले.

Web Title: Police solved dispute of gutkha addicted couple, women ready to leave addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.