अजबच! 1, 2 नव्हे तर 'या' व्यक्तीला आहेत तब्बल 27 बायका अन् 150 मुलं; घरात आहेत भलतेच नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 02:57 PM2022-02-28T14:57:19+5:302022-02-28T15:04:15+5:30

Winston Blackmore : 38 वर्षांच्या मेरीने आपल्या वडिलांच्या या लाईफस्टाईल आणि अजबगजब घराबाबत जगाला माहिती दिली.

polygamist man Winston Blackmore got fame married 27 times and have 150 kids big family | अजबच! 1, 2 नव्हे तर 'या' व्यक्तीला आहेत तब्बल 27 बायका अन् 150 मुलं; घरात आहेत भलतेच नियम

अजबच! 1, 2 नव्हे तर 'या' व्यक्तीला आहेत तब्बल 27 बायका अन् 150 मुलं; घरात आहेत भलतेच नियम

Next

लोकांना एक लग्न सांभाळताना नाकीनऊ येतात. एकमेकांसोबत पटत नसल्याने रोज घटस्फोटाच्या बातम्याही येतच असतात. पण तुम्हाला वाचून नवल वाटेल की, एका माणसाने एक दोन नव्हे तर तब्बल 27 लग्न केली आहेत. या 27 लग्नांनंतर त्याला एकूण 150 मुलं आहेत. विंस्टन ब्लॅकमोर (Winston Blackmore) असं व्यक्तीचं नाव असून त्याच्या या अनोख्या कारनाम्यामुळे लोकप्रियता मिळाली आहे. लोकं त्याला अनेक पत्नी असणारा म्हणजेच पॉलीगॅमिस्ट (Polygamist) असं म्हणतात.

The Sun मध्ये छापून आलेल्या रिपोर्टनुसार कॅनडातील विंस्टन ब्लॅकमोर (Winston Blackmore) ने 27 लग्न केली आहेत आणि त्याच्या पहिल्या बायकोपासून झालेल्या मुलीचं नाव मेरी जेन ब्लॅकमोर (Mary Jayne Blackmore) आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विंस्टनने कितीही लग्न केलेली असली तरी त्याची फक्त पहिली बायको हीच कायदेशीर पत्नी आहे. 38 वर्षांच्या मेरीने आपल्या वडिलांच्या या लाईफस्टाईल आणि अजबगजब घराबाबत जगाला माहिती दिली.

मेरी 8 वर्षांची होईपर्यंत वडिलांची 5 लग्न

Mormon Community चं हे कुटुंब वेगळंच आहे. 65 वर्षांच्या विंस्टनच्या पहिल्या लग्नापासून त्याला मेरी जेन नावाची मुलगी झाली. मेरी सांगते की, ती जेव्हा 14 वर्षांची होती. तोपर्यंत तिच्या वडिलांची 12 लग्नं झाली होती आणि घरामध्ये एकूण 40 बहिण-भावांची फौज होती. 18 व्या वर्षी विंस्टनचं लग्न झालं आणि 26 व्या वर्षी त्यांना बिशप करण्यात आलं होतं. 1982 मध्ये त्यांच्या बायकोच्या प्रेग्नन्सीच्या काळात त्यांनी दुसरं लग्न केलं आणि तिसरंही केलं. मेरी 8 वर्षांची होईपर्यंत तिच्या वडिलांची 5 लग्न झाली होती. जोपर्यंत ती मोठी झाली तोपर्यंत विंस्टननी लग्न करून घरी 27 बायका आणल्या होत्या आणि मेरीचं 150 भाऊ-बहिणींनी भरलेलं संपूर्ण कुटुंब झालं होतं.

घरी खूप कडक नियम

2017 साली विंस्टनवर बहुविवाहाचा आरोप लावण्यात आला होता, कारण कॅनडामध्ये हे बेकायदेशीर आहे. 2018 सालापर्यंत त्यांना शिक्षा म्हणून 6 महिन्यांपर्यंत नजरबंदीत ठेवण्यात आलं. विंस्टनचं पहिलं लग्न कायदेशीर मानण्यात आलं असून त्यांचं म्हणणं आहे की, इतर लग्नही त्यांचे ‘आध्यात्मिक विवाह’ आहेत. विंस्टनची मुलगी मेरी सांगते की, त्यांच्या घरी खूप कडक नियम होते. महिलांना ना मेकअप करण्याची ना स्टायलिश केस कापण्याची परवानगी होती. तसंच त्यांना चहा, कॉफी, दारू आणि सिगरेट पिण्याचीही परवानगी नव्हती. घरामध्ये ना टीव्ही, ना गाणी आणि पुस्तकंही वाचली जात नसतं. ती सांगते की, संपूर्ण कुटुंबच थोडं अजब आहे. पण तिला एका गोष्टीचा आनंद आहे की, तिचे शेकडो नातेवाईक आहेत. एक हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: polygamist man Winston Blackmore got fame married 27 times and have 150 kids big family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.