महिला बाथरूममध्ये करत होती 'हे' विचित्र काम, कोर्टाने सार्वजनिक टॉयलेटचा वापर करण्यावर घातली बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 06:49 PM2021-07-16T18:49:19+5:302021-07-16T18:53:23+5:30
आता कोर्टाकडून मिळालेल्या आदेशानुसार, अमांडा ली वर काही गोष्टींची बंदी घालण्यात आली आहे. ज्यात सार्वजनिक ठिकाणांवर लघवी करणे आणि शौचास जाणे यांचा समावेश आहे.
ब्रिटनमध्ये एका महिलेचा विचित्र कारनामा समोर आला आहे. शौचास गेल्यावर घाणेरडा आवाज काढण्यावरून कोर्टाने एका महिलेवर सार्वजनिक ठिकाणी शौचास किंवा टॉयलेटला जाण्यावर बंदी घातली आहे. ज्या महिलेवर कोर्टाकडून ही बंदी घालण्यात आली तिचं नाव अमांडा ली असून तिच वय ५० वर्षे आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमांडा ली च्या विचित्र सवयीमुळे तिचे शेजारी गेल्या २५ वर्षापासून वैतागलेले आहेत. अमांडा ली जेव्हाही शौचास किंवा टॉयलेटला जात होती तेव्हा तिच्या शेजाऱ्यांचं घरात राहणं अवघड होत होतं. त्यांनी महिलेविरोधात अनेकदा तक्रारही केली होती.
कोर्टाकडून पोलिसांना अमांडा विरोधात अपराधिक केस चालवण्याची मंजूरी मिळाली आहे. अमांडा ली हिला १९९६ ते २०१८ पर्यंत या केसमध्ये १५ वेळा शिक्षा मिळाली आहे. यात असामाजिक व्यवहार, अत्याचार आणि सार्वजनिक व्यवस्थेचं उल्लंघन यांसारख्या घटनांचा समावेश आहे.
आता कोर्टाकडून मिळालेल्या आदेशानुसार, अमांडा ली वर काही गोष्टींची बंदी घालण्यात आली आहे. ज्यात सार्वजनिक ठिकाणांवर लघवी करणे आणि शौचास जाणे यांचा समावेश आहे. कोर्टाच्या आदेशानुसार जर अमांडा ली अटींचं उल्लंघन करेल तर तिला पाच वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. साउत चेशायर मॅजिस्ट्रेट कोर्टाने याप्रकरणी निर्णय दिला आहे.
'द सन'च्या एका रिपोर्टनुसार, अमांडा ली चं हे विचित्र वागणं १९९० पासून असंच आहे. तिला अनेकदा अशा गोष्टींसाठी दोषी ठरवण्यात आलं आहे, ज्यांनी आजूबाजूच्या लोकांवर वाईट प्रभाव पडतो.