मेघालयात झाडांच्या मुळांपासून बनविलेले पूल

By admin | Published: January 12, 2017 12:52 AM2017-01-12T00:52:22+5:302017-01-12T00:52:22+5:30

अशिया खंडात २००३ मध्ये मेघालयातील पूर्व खासी हिल्समध्ये मावलिन्नोंग या नावाचे खेडे सर्वात स्वच्छ असल्याचे मानकरी ठरले होते.

A pool made of root of trees in Meghalaya | मेघालयात झाडांच्या मुळांपासून बनविलेले पूल

मेघालयात झाडांच्या मुळांपासून बनविलेले पूल

Next

अशिया खंडात २००३ मध्ये मेघालयातील पूर्व खासी हिल्समध्ये मावलिन्नोंग या नावाचे खेडे सर्वात स्वच्छ असल्याचे मानकरी ठरले होते. झाडांच्या मुळांपासून बनविलेल्या पुलांसाठी हे खेडे प्रसिद्ध आहे. खासी हिल्समधील खेडी एकमेकांशी पाथवेजने जोडलेली आहेत. या पाथवेजना ‘किंग्ज वे’ असे म्हटले जाते. या नेटवर्कच्या माध्यमातून फिकुस इलास्टिकाची शेकडो जिवंत मुळे एकमेकांशी जोडली जाऊन त्यांचा पूल तयार केला जातो. हे मुळांचे पूल (त्यातील काही तर शेकडो फूट लांब आहेत) प्रत्यक्ष वापरात येण्यासाठी दहा ते १५ वर्षे घेतात. हे पूल अतिशय बळकट असतात. त्यातील काही तर एकाचवेळी  ५० किंवा त्यापेक्षा जास्त माणसांचे वजन सहन करू शकतात.

Web Title: A pool made of root of trees in Meghalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.