जगातील असे ५ प्रसिद्ध देश जिथे नाही एकही एअरपोर्ट, तरीही लोक जाण्यासाठी असतात उत्सुक!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 03:43 PM2024-11-06T15:43:01+5:302024-11-06T15:43:47+5:30
No Airport Country : आज अशाच काही देशांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महत्वाची बाब म्हणजे देशांमध्ये एअरपोर्ट नसूनही जगभरातील लोक इथे फिरायला जाण्यासाठी उत्सुक असतात.
No Airport Country : विमान सेवेमुळे आजकाल एका देशातून दुसऱ्या देशात जाणं फारच सोपं आणि सोयीचं झालं आहे. जग जवळ आलं आहे, असं म्हटलं जातं. मात्र, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, आजही असे काही देश आहेत जिथे एअरपोर्टच नाहीत. आज अशाच काही देशांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महत्वाची बाब म्हणजे देशांमध्ये एअरपोर्ट नसूनही जगभरातील लोक इथे फिरायला जाण्यासाठी उत्सुक असतात.
अंडोरा
अंडोरा हा फ्रान्स आणि स्पेनच्या मधील पायरेनीस डोंगरांनी वेढलेला एक मायक्रो स्टेट आहे. हा देश त्याचे स्की रिसॉर्ट्स आणि ड्यूटी फ्री शॉपिंगसाठी ओळखला जातो. इथे जाण्यासाठी प्रवाशी फ्रान्सच्या टूलूज-ब्लाग्नेक एअरपोर्ट किंवा स्पेनच्या बार्सिलोना-एल प्रेट एअरपोर्टवर उतरतात. अंडोरा येथून जवळपास १५० किलोमीटर दूर आहे.
व्हॅटिकन सिटी
व्हॅटिकन सिटी जगातील सगळ्यात छोटा देश आहे. हा रोम आणि इटलीच्या मधे केवळ ०.४९ वर्ग किलोमीटर परिसरात पसरला आहे. इथे जाण्यासाठी तुम्हाला जवळचं रोममधील लियोनार्डो दा विंची-फिमिसिनो इथे उतरावं लागेल. हे एअरपोर्ट व्हॅटिकन सिटीपासून जवळपास ३० किलोमीटर दूर आहे.
मोनाको
यूरोपियन देश मोनाको आपले महागडे कसिनो, पोर्ट आणि ग्रॅंड प्रिक्ससाठी प्रसिद्ध आहे. मोनाको हे शहर श्रीमंत लोकांसाठी स्वर्ग मानलं जातं. हा देश पर्यटनासाठीही खूप फेमस आहे. इथे पोहोचण्यासाठी फ्रान्समधील नाइस कोटे डी'अज़ूर एअरपोर्टवर उतरावं लागतं.
सॅन मॅरिनो
सॅन मॅरिनो जगातील सगळ्यात जुन्या देशांपैकी एक आहे. हा देश डोंगराळ भागातील एक मायक्रो स्टेट आहे. हा देश पूर्णपणे इटलीने वेढलेला आहे. याचं क्षेत्रफळ ६१ वर्ग किलोमीटर आहे. इथे पोहोचण्यासाठी इटलीच्या रिमनी येथील फेडेरिको फेलिनी एअरपोर्टवर उतरावं लागेल.
लिकटेंस्टीन
लिकटेंस्टीन हा जगातील सगळ्यात श्रीमंत देशांपैकी एक आहे. हा देश स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया मधे १६० स्क्वेअर किलोमीटरमध्ये वसलेला आहे. हा देश आपल्या अद्भुत अल्पाइन लॅंडस्केप आणि मॅंडियवल स्ट्रक्चरसाठी ओळखला जातो. इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला स्वित्झर्लंडच्या झ्युरिख येथील एअरपोर्टवर उतरावं लागेल.