कोर्टाच्या कामानंतर Porn Star बनत होता जज, पकडला गेल्यावर कोर्टाने घेतला असा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 01:23 PM2023-03-27T13:23:11+5:302023-03-27T13:26:32+5:30
न्यायाधीशाने ओन्लीफॅन्सवर एका पॉर्न स्टारच्या रूपात अनेक पोस्ट केल्या आणि त्यानंतर त्याच्या विरोधात कारवाई करून त्याना काढण्यात आलं.
Porn Star Post Viral : अमेरिकेतील एका न्यायाधीशाने आपल्या कोर्टाच्या कामानंतर एका पॉर्न स्टारच्या रूपात काम केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, न्यूयॉर्क शहर (एनवायसी) चा एक 33 वर्षीय प्रशासकीय न्यायाधीश ग्रेगरी ए लोकेने फॅन्सकडून दर महिन्याला 12 डॉलर इतकी रक्कम घेतली आणि 100 पेक्षा अधिक अॅडल्ड पोस्ट प्रोड्यूस केल्या.
न्यायाधीशाने ओन्लीफॅन्सवर एका पॉर्न स्टारच्या रूपात अनेक पोस्ट केल्या आणि त्यानंतर त्याच्या विरोधात कारवाई करून त्याना काढण्यात आलं. ग्रेगरी ए लोकेचं JustFor.Fans वर एक एक्स-रेटेड अकाऊंट होतं, ज्यासाठी तो $9.99 चार्ज करत होता.
OnlyFans वर ग्रेगरीने आपल्या डिटेल पेजवर लिहिलं की, 'व्हाईट कॉलर प्रोफेशनल दिवसा आणि रात्री अनप्रोफेशनल. नेहमीच शौकीन, नेहमीच रॉ'. ग्रेगरी ए लोकेच्या अकाऊंटमध्ये डझनभर फोटो आणि व्हिडीओ आहेत ज्यात हार्डकोर पॉर्नोग्राफी आणि ऑर्गेज्म होते. त्याने एका पोस्टमध्ये सांगितलं होतं की, तो न्यायाधीश आहे.
त्याच्या या व्यवहाराला न्यूयॉर्क सिटीच्या अधिकाऱ्यांना फार गंभीरतेने घेतलं. सिटी काउंसिलवॉमन विकी पलाडिनो यांनी पोस्टमध्ये सांगितलं की, प्रत्येक शहरातील लोकांना आपल्या कोर्टावर पूर्ण विश्वास असला पाहिजे. तसेच लोकेसारख्या लोकांना आपल्या पदावरून काढलं पाहिजे. अशा लोकांमुळे न्याय व्यवस्थेवरून लोकांचा विश्वास उडतो.