मर्द को दर्द नहीं होता! लग्नापूर्वी नवऱ्याला चाबकाचे फटके देण्याची प्रथा; वेदना सहन न झाल्यास लग्न रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 10:46 PM2021-09-01T22:46:20+5:302021-09-01T23:24:27+5:30

प्रत्येक देशामध्ये काही ना काही प्रथा परंपरा आजही जोपासल्या जातात. परंतु काही देशातील या प्रथा ऐकल्या तर तुमच्या अंगावर काटा येईल.

the practice of whipping the husband before marriage; Marriage annulled if pain is not tolerated | मर्द को दर्द नहीं होता! लग्नापूर्वी नवऱ्याला चाबकाचे फटके देण्याची प्रथा; वेदना सहन न झाल्यास लग्न रद्द

मर्द को दर्द नहीं होता! लग्नापूर्वी नवऱ्याला चाबकाचे फटके देण्याची प्रथा; वेदना सहन न झाल्यास लग्न रद्द

googlenewsNext

नवी दिल्ली – सभ्यतेच्या विकासानंतर आजही जगातील अनेक देशात अशा अजब-गजब प्रथा आहेत ज्या ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. अशा काही प्रथा परंपरांमध्ये आफ्रिकन देश सगळ्यात पुढे आहेत. आफ्रिकाच्या जाती समुदायात आजही हजारो वर्षाच्या परंपरांचे पालन केले जाते जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल, नेमक्या या प्रथा आहेत कोणत्या? जाणून घेऊया.

प्राण्यांचं रक्त पिणं आणि थुकून स्वागत करणं

अभिवादन करणे प्रत्येक जण सन्मानाप्रमाणे घेते परंतु केनिया आणि तंजानिया येथे आढळणाऱ्या मासाई समुदायात अभिवादन करण्याची प्रथा इतकी अब्रु घालवणारी आहे ज्याने तुम्ही हैराण व्हाल. याठिकाणी लोक एकमेकांवर थुकून हॅलो करतात. त्याशिवाय जेव्हा कधीही लहान नवजात बालक जन्माला येते तेव्हा घरातील पुरुष सदस्य नवजात शिशूवर थुकतात. या लोकांना मानणं आहे की, ही प्रथा लहान मुलांवरील वाईट आत्मापासून वाचवतं. मासाई योद्धा एका वृद्धाला हात मिळवताना त्याच्या हातावर थुंकतात. तसेच मासाई समुदायात अनेक लोक प्राण्यांचे रक्तही पित असल्याचं आढळतं.

मृतदेहाचा गळा कापून करतात पवित्र

मलावीमध्ये आढळणाऱ्या चेवा समुदायात बंटू ही जात आहे. या जातीतील लोक कुणाचंही निधन झाल्यास धक्कादायक प्रकार करतात. मृतदेहाला पवित्र स्थानावर घेऊन जात त्याठिकाणी गळा चिरून शरीरातील आतमध्ये सफाई केली जाते. पाणी शरीरातून तोपर्यंत काढलं जातं जोवर ते साफ होत नाही. त्यानंतर पाणी एकत्रित केले जाते आणि त्या पाण्याचा वापर करून भोजन तयार करण्यात येते.

पुरुषार्थ सिद्ध करण्याची अनोखी प्रथा

 इथियोपियो येथे युवा मुलांना त्यांचे पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी कुठल्या ना कुठल्या परीक्षेतून जावं लागतं. यातील एक बुल जपिंग आहे. याठिकाणी युवा मुले सर्व कपडे काढून बैलाच्या पाठीवर बसवलं जातं. त्यावेळी अनेकदा बैलाच्या पाठीवर धावताना जो लक्ष्यापर्यंत पोहचतो त्याला विवाह योग्य मानलं जातं.

नवरीची काकी घेते कौमार्य चाचणी

युगांडामध्ये राहणाऱ्या एका अल्पसंख्याक समुदायात बन्यानकोलो जातीत लग्नाआधीच नवरीची काकी नवऱ्याची कौमार्य चाचणी घेते. शक्ति परीक्षण करण्यासाठी काकीसोबत संबंध बनवले जातात. त्याचसोबत नवरी मुलीचीही कौमार्य चाचणी घेतली जाते.

लग्नापूर्वी नवरदेवाला मारण्याची प्रथा

फुलानी जनसमुदायात लग्न करण्यापूर्वी मारण्याची प्रथा आहे. यात नवरदेवाला समुदायातील जेष्ठ सदस्यांकडून मारलं जातं जेणेकरून नवरदेव लग्नासाठी योग्य बनू शकतो. जर माणूस मजबुत नसेल आणि त्याला वेदना सहन झाल्या नाहीत तर लग्न रद्द केले जाते. जर कुठल्या मुलाला चाबकाची शिक्षा टाळायची असेल तर त्याऐवजी तो 'कौगल' पर्याय निवडू शकतो, जो हुंडा देण्यासारखा आहे.

Web Title: the practice of whipping the husband before marriage; Marriage annulled if pain is not tolerated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न